फेसबुकचं नवं फिचर, व्हिडीओ विथ ऑडिओ होणार ऑटो प्ले
By Admin | Published: February 16, 2017 09:13 AM2017-02-16T09:13:55+5:302017-02-16T09:19:32+5:30
फेसबुकने ऑटो प्ले व्हिडीओ हे नवं अपडेट दिलं असून व्हिडीओसोबत ऑडिओ ऑटो प्ले होणार आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - आपल्या युझर्सना नेहमी काहीतरी नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करणा-या फेसबुकने नवं फिचर आणलं आहे. फेसबुकने ऑटो प्ले व्हिडीओ हे नवं अपडेट दिलं आहे. या नव्या फिचरमुळे फेसबूकवर व्हिडीओ पाहताना सोबत ऑडिओही ऐकायला मिळणार आहे. याआधी आपण जेव्हा स्क्रोल करत असताना एखादा व्हिडीओ आला की तो ऑटो प्ले व्हायचा मात्र त्याचा ऑडिओ म्यूट असायचा. ऑडिओसाठी तो व्हिडीओ ओपन करुन ऑप्शनमध्ये जाऊन सुरु करावा लागत असे. मात्र नव्या अपडेटनुसार फेसबुकवरील व्हिडीओ ऑटो प्ले झाल्यानंतर ऑडिओही सुरु होईल. त्यासाठी वेगळं क्लिक करण्याची गरज यूझर्सना पडणार नाही.
फेसबुकने हे नवं फिचर आणल्याने युझर्स मात्र नाराज आहेत. त्यामुळे हे फिचर काढून टाकण्याची मागणी युझर्सकडून केली जात आहे. पण फेसबुक हे फिचर काढून टाकण्याची इच्छा नाही. सार्वजनिक ठिकाणी फेसबूकवर असताना अचानक येणारा ऑडिओ त्रासदायक ठरु शकतो. तसंच क्लास, काम किंवा डिनरला गेलो असताना फेसबूकवर काही पाहत असल्यास ऑडिओ सुरु झाला तर लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचं युझर्सनी म्हटलं आहे.
पण अशा युझर्ससाठी फेसबुकने पर्याय उपलब्ध केला फेसबुकच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले ऑफ करता येणार आहे. ज्यामध्ये हे फीचर डिसेबल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसंच फोन सायलेंट मोडवर असताना ऑटो प्ले ऑडिओ होणार नाही याची काळजी फेसबुकने घेतली आहे.
तसंच उभे व्हिडीओ सहजपण एक्स्पांड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अनेकदा एखाद्या व्हिडीओमधील ठराविक गोष्टच पाहायची असते त्यांच्यासाठी प्रोग्रेस बार देण्यात आला असून व्हिडीओच्या स्लाईड्स पाहणं शक्य होणार आहे. त्यामुळे व्हिडीओमधील ठराविक गोष्ट पाहणं शक्य होईल.
फेसबुकने यूझर्ससाठी ‘वॉच अँड स्क्रोल’चं फीचरही आणलं आहे ज्याचा अनेकांना फायदा होणार आहे. फेसबुकवर एखादा व्हिडीओ पाहायचा आहे, मात्र त्याचवेळी न्यूज फीडही पाहायच्या आहेत त्यांच्यासाठी हे फिचर कामाचं आहे. या फिचरमध्ये हवा असलेला व्हिडीओ एका कोपऱ्यात ड्रॅग करुन तुम्ही पाहू शकता. ज्यामुळे तुमच्या स्क्रोलिंगमध्ये कोणता अडथळा येत नाही.
आणखी एक महत्त्वाची घोषणा फेसबुककडून करण्यात आलीय. फेसबुकवरील व्हिडीओ टीव्हीवर पाहता येणार आहेत. त्यासाठी टीव्ही अॅपची घोषणा केलीय. अॅपल टीव्ही सॅमसंग टीव्ही आणि अमेझॉन टीव्ही यांसोबत फेसबुकचं अॅप जोडता येईल, अशी माहिती मिळाली आहे.