फेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गचा मुस्लिमांना पाठिंबा
By admin | Published: December 10, 2015 09:18 AM2015-12-10T09:18:15+5:302015-12-10T09:18:34+5:30
फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने मुस्लिमांना पाठिंबा दर्शवत सर्व मुस्लिमांच्या हक्कासाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १० - पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात मुस्लिमांमविरोधात वाढत चाललेला असंतोष तसेच त्यांना अमेरिकेत प्रवेशबंदी करावी हे अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य या सर्व गोष्टींना 'फेसबूक'चा संस्थापक मार्क झुकेरबर्गने विरोध दर्शवला आहे. तसेच 'फेसबूक' अकाऊंटवर पोस्ट अपलोड करून त्याने जगभरातील मुस्लिमांना पाठिंबा दर्शवला आहे. फेसबूकचा सर्वेसर्वा या नात्याने आपण सर्व मुस्लिमांच्या हक्कासाठी लढत राहू तसेच मुस्लिमांसाठी सुरक्षित व शांतीचं वातावरण तयार व्हावं यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे मार्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मार्क झुकेरबर्गची पोस्ट :
मी आपल्या समाजासोबत जगभरातील मुस्लिमांना पाठिंबा देत आहे. पॅरिस हल्ल्या व या आठवड्यात व्यक्त झालेल्या द्वेषाच्या भावनानंतर इतरांच्या कृत्यांमुळे मुस्लिमांना इतरांचा रोष व तिरस्कार सहन करावा लागत असून त्यामुळे त्यांना (मुस्लिम) किती भीती वाटत असेल याची मी केवळ कल्पनाच करू शकतो.
एक ज्यू म्हणून माझ्या आई-वडिलांनी मला इतर कोणत्याही धर्माच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात उभं राहायला शिकवलं आहे. भलेही आज असा हल्ला तुमच्याविरोधात न होवो, मात्र येणाऱ्या काळात कोणाच्याही स्वातंत्र्यावर होणा-या हल्ल्यांमुळे प्रत्येकाचेच नुकसान होईल
फेसबुकचा प्रमुख म्हणून मी तुम्हांला सांगू इच्छितो की, या मंचावर तुमचं नेहमीच स्वागत आहे. मी तुमच्या हक्कांसाठी नेहमी लढा देईन आणि तुमच्यासाठी सुरक्षित व शांतीचं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करेन. आपण कधीच आशा सोडली नाही पाहिजे. जर आपण एकत्र राहून एकमेकांतील चांगल्या गोष्टी पाहत राहू, तर आपण नक्कीच एक चांगलं जग निर्माण करु शकू.