फॅक्ट चेक : बांगलादेशमधील हिंदू मंदिरांना आगी लावल्या जात आहेत का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:05 PM2024-08-07T13:05:49+5:302024-08-07T13:06:56+5:30

काही जण हिंदू मंदिराला आग लावली, असे सांगून त्याच्या आगीचा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. अनेक हिंदू महिलांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मात्र, हे व्हिडीओ जुने असल्याचे फॅक्टचेकमधून समोर आले आहे.

 Fact Check Are Hindu Temples Being Set On Fire In Bangladesh |  फॅक्ट चेक : बांगलादेशमधील हिंदू मंदिरांना आगी लावल्या जात आहेत का? 

 फॅक्ट चेक : बांगलादेशमधील हिंदू मंदिरांना आगी लावल्या जात आहेत का? 

सध्या बांगलादेशात अराजक माजले असून, हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, अनेक व्हिडीओ खोटे असून, धार्मिक भावना भडकवण्यासाठी पसरविले जात आहेत. छायाचित्रात जे दिसत आहे ते हिंदू मंदिर नसून, ते रेस्टॉरंट आहे. मात्र, काही जण हिंदू मंदिराला आग लावली, असे सांगून त्याच्या आगीचा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. अनेक हिंदू महिलांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मात्र, हे व्हिडीओ जुने असल्याचे फॅक्टचेकमधून समोर आले आहे.

पोलिसांसमोर निडरपणे उभा राहिला अन् त्याच्यावर गोळ्या झाडल्या अबू सईद हा रंगपूरच्या बेगम रोकिया विद्यापीठाचा विद्यार्थी आंदोलनात सर्वात पुढे होता. मात्र पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्याचा निडरपणे उभा असलेला फोटो सध्या व्हायरल होत आहे. १६ जुलै रोजी आंदोलनात तो पोलिसांसमोर पन्नास-साठ फुटांवर उभा होता. यावेळी दोन्ही हात फैलावून, हातात काठी घेऊन, छाती पुढे काढून तो उभा होता. पोलिसांना न घाबरता तो सामोर गेला होता. त्याच्याकडे कोणतेही शस्त्र नसताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्यावर गोळीबार गेल्यानंतर आंदोलनाची धग वाढली.

Web Title:  Fact Check Are Hindu Temples Being Set On Fire In Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.