इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा मुलगाही सैन्यात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 08:57 PM2023-10-11T20:57:29+5:302023-10-11T20:58:06+5:30

सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला जात आहे

Fact Check Viral Image Of Israel PM Benjamin Netanyahu Sending His Son To The Army see details | इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा मुलगाही सैन्यात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा मुलगाही सैन्यात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

Israel Hamas War, Benjamin Netanyahu Son Viral Photo Fact Check:  इस्रायली सैन्याने हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या राखीव सैनिकांना कामावर बोलावले आहे. आतापर्यंत 300,000 राखीव सैनिक इस्रायली सैन्यात सामील झाले आहेत. माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचाही यांचाही यात समावेश आहे. या दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे, ज्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या मुलाला इस्रायली सैन्यात भरती होण्यासाठी पाठवल्याचा दावा केला जात आहे. या छायाचित्रात नेतन्याहू सैन्याच्या गणवेशात आपल्या मुलासोबत दिसत आहेत. नेतान्याहू हे स्वत: इस्रायली सैन्यात कमांडो राहिले आहेत. त्यांचा भाऊ जोनाथन नेतन्याहू यांनी ऑपरेशन थंडरबोल्ट दरम्यान युगांडाची राजधानी एन्टेबे येथे ओलीस ठेवलेल्या इस्रायली प्रवाशांची सुटका केली होती. मात्र दुर्दैवाने, या ऑपरेशन दरम्यान जोनाथन यांचा मृत्यू झाला. पण आता मुलाबद्दलचा फोटो व्हायरल होत आहे. जाणून घेऊया याबद्दल...

सोशल मीडियावर काय दावा?

मेघ अपडेट्स नावाच्या ट्विटर हँडलने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या मुलाचा फोटो ट्विट केला आहे. या छायाचित्रात नेतन्याहू यांचा मुलगा लष्करी गणवेशात दिसत आहे. त्यांनी हे छायाचित्र ट्विट करून लिहिले आहे की, “इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी आपल्या मुलाला सैनिक बनवून देशसेवेसाठी पाठवले, फोटो व्हायरल झाला आहे.” याशिवाय अनेक ट्विटर हँडलनेही हे छायाचित्र ट्विट केले आहे. या सर्व ट्विटमध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे कौतुक केले जात आहे. अनेक हँडलने भारतीय राजकारण्यांशीही ते जोडले आहे.

काय आहे व्हायरल फोटोचे सत्य?

नेतन्याहू यांचा मुलासोबतचा हा फोटो डिसेंबर 2014 मधला आहे. इस्रायली मीडिया जेरुसलेम पोस्टने 1 डिसेंबर 2014 रोजी प्रकाशित केलेल्या बातमीत हा फोटो प्रदर्शित केला होता. जेरुसलेम पोस्टने या बातमीत लिहिले होते की, "पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा धाकटा मुलगा अवनर नेतन्याहू याने सोमवारी इस्रायली संरक्षण दलाच्या (आयडीएफ) कॉम्बॅट इंटेलिजेंस कलेक्शन कॉर्प्समध्ये सामील होऊन तीन वर्षांच्या अनिवार्य लष्करी सेवेला सुरुवात केली. सेवेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक सैनिकाप्रमाणे, अवनेर त्याच्या पालकांसोबत जेरुसलेमच्या अॅम्युनिशन हिलवर गेला. या बातमीनुसार, अवनरची लष्करी सेवा डिसेंबर 2017 मध्ये पूर्ण झाली. त्याला नंतर सैन्यात सामील होण्यासाठी बोलावण्यात आले.

दरम्यान एक मात्र खरं की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांचा मुलगा अवनर नेतान्याहू यांचा सोशल मीडियावर शेअर होत असलेला फोटो जुना आहे. सध्याची परिस्थिती पाहता अवनेर इस्रायली लष्करात सामील झाला आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: Fact Check Viral Image Of Israel PM Benjamin Netanyahu Sending His Son To The Army see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.