अफगानिस्तानवर कुणाचा कंट्रोल? नेतृत्वावरून तालिबानमध्येच गटबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 05:03 PM2021-08-29T17:03:12+5:302021-08-29T17:04:48+5:30

अफगाणिस्तानात स्थानिक पातळीवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान अधिकाधिक विभाजित होत आहे. विविध गट आधीच आपापल्या बैठका घेत आहेत.

factionalism  in taliban over leadership of afghanistan  | अफगानिस्तानवर कुणाचा कंट्रोल? नेतृत्वावरून तालिबानमध्येच गटबाजी

अफगानिस्तानवर कुणाचा कंट्रोल? नेतृत्वावरून तालिबानमध्येच गटबाजी

Next


काबूल ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानवर कोण राज्य करेल?  यावरून तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष आहे. यामुळे आधीच रक्तरंजित आणि युद्धग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानची चिंता अधिक वाढली आहे. न्यूयॉर्क पोस्टमधील एका लेखात, होली मॅके यांनी म्हटले आहे, अनेक स्त्रोत आणि माजी गुप्तचर आणि लष्करी अधिकाऱ्यांनी विविध तालिबानी गटांमध्ये विभाजनाची पुष्टी केली आहे.

"अफगाणिस्तानात स्थानिक पातळीवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान अधिकाधिक विभाजित होत आहे. विविध गट आधीच आपापल्या बैठका घेत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तालिबानमध्ये कमांड देण्याच्या बाबतीत ऐक्याचा अभाव आहे," कसे काबूलमधील एका माजी सरकारी सूत्राने म्हटले आहे.

पंजशीरच्या वाघाची डरकाळी! अमरुल्ला सालेहच्या एका ट्विटनं तालिबानी घाबरले, इंटरनेट केलं बंद

"अफगाणिस्तानात सत्तेवरून प्रचंड वाद सुरू आहेत. विविध जाती आणि जमातींना सत्ता हवी आहे. तालिबानसाठी हा मोठा धक्का आहे," असे सूत्राने सांगितले. हक्कानी नेटवर्ककडे आधीच काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी (प्रभारी म्हणून) देण्यात आली आहे. ते अफगाणिस्तानशी संबंधित राजकीय आणि लष्करीदृष्ट्या पडद्यामागील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे, अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या आणि 50 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यालाच अफगाणिस्तानमधील सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, एका अफगाण इंटेल इनसाइडरने दिलेल्या माहितीनुसार, असे मानले जाते, की हक्कानी यांचे निष्ठावंत अमेरिकन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. ते हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळातच (एचकेआयए) हस्ता स्थानांतरित करण्याची योजना आखत होते. अमेरिकेतील आणखी एका गुप्तचर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री विमानतळ परिसरात तालिबानी गटांमध्ये गोळीबाराची घटनाही घडली.
 

 

Web Title: factionalism  in taliban over leadership of afghanistan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.