जपानमध्ये शतायुषी लोक ६९,७८५; दोन दशकांत शतायुषी होण्याच्या प्रमाणात सातपट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:40 PM2018-09-14T23:40:13+5:302018-09-15T06:26:59+5:30
आरोग्याबद्दल वाढलेली जागरूकता आणि खूपच प्रगत वैद्यकीय उपचार व सेवांमुळे लोक शतायुषी होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
टोक्यो : जपानमध्ये शतायुषी (१०० किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचे) मंडळींची संख्या या महिन्यात ६९ हजार ७८५ झाली असून, त्यात ८८.१ टक्के या महिला आहेत. ही माहिती शुक्रवारी सरकारने दिली. आरोग्याबद्दल वाढलेली जागरूकता आणि खूपच प्रगत वैद्यकीय उपचार व सेवांमुळे लोक शतायुषी होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या शतायुषी मंडळींच्या संख्येत २ हजार १४ जणांची भर पडली. दोन दशकांपूर्वी जेवढे शतायुषी लोक होते त्यात जवळपास सातपट वाढ झाली.