मायलेजबाबत खोटा दावा केला

By admin | Published: April 27, 2016 05:05 AM2016-04-27T05:05:03+5:302016-04-27T05:05:03+5:30

१९९१ पासूनच खोटे दावे केले गेल्याचे अंतर्गत तपासणीत आढळल्याची कबुली जपानी वाहन कंपनी मित्सुबिशी मोटर्स कॉर्पोरेशनने दिली आहे.

False claims about mileage | मायलेजबाबत खोटा दावा केला

मायलेजबाबत खोटा दावा केला

Next

तोक्यो : आपल्या काही मॉडेलच्या मायलेज चाचणीबाबत १९९१ पासूनच खोटे दावे केले गेल्याचे अंतर्गत तपासणीत आढळल्याची कबुली जपानी वाहन कंपनी मित्सुबिशी मोटर्स कॉर्पोरेशनने दिली आहे.
आपल्या काही मॉडेलच्या इंधनाच्या सरासरी खप (मायलेज) डेटाबाबत मुद्दाम खोटे दावे करण्यात आल्याचे कंपनीने गेल्या आठवड्यात कबूल केले होते.
या पार्श्वभूमीवर कंपनीचे अध्यक्ष तेतेसुरो आईकावा यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, या प्रकाराची चौकशी सुरू आहे. त्यातून काही तरी घोटाळा झाल्याचे संकेत मिळतात. याबाबत संपूर्ण स्थिती स्पष्ट झालेली नाही. खरे चित्र लवकरच स्पष्ट होईल. ही प्रक्रिया चालू आहे. हे प्रकरण इतके किचकट आहे की, कंपनी काय पाऊल उचलेल हे सांगता येत नाही. मायलेज चांगले आहे हे दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी ही लबाडी का केली हे समजत नाही.
या कंपन्यांच्या अनेक मॉडेलमध्ये या पूर्वीही अनेक तांत्रिक दोष आढळले होते. १५ वर्षांपूर्वीच ते उघड झाले होते. त्यावर पांघरूण घालण्याचे पद्धतशीर प्रयत्न तोक्योस्थित या कंपनीतर्फे वारंवार करण्यात आले होते.
इ के वॅगन आणि इके स्पेस हलक्या प्रवासी कार यांच्या १,५७,००० मॉडेलच्या मायलेजची चाचणी घेण्यात आली असता ती दावा करण्यात आलेल्या मायलेजपेक्षा चूक निघाली.

शिवाय निस्सान मोटर्ससाठी उत्पादन करण्यात आलेल्या डेज आणि डेज रॉक्स यांच्या ४,६८,००० वाहनांच्या मायलेजबाबतही हाच प्रकार आढळला होता.
हे सर्व मॉडेल्स तथाकथित ‘मिनी कार्स’ असून ते चांगले मायलेज देताच हे त्या वाहनांचे मुख्य आकर्षण होते. मार्च २०१३ पासून त्यांचे उत्पादन केले जाते. या वाहनांच्या डेटात सुसूत्रता नसल्याची तक्रार निस्सानने केल्यानंतर ही समस्या उघडकीस आली. मायलेजबाबत २०११ मध्ये जे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यात २०१३ मध्ये अचानक वाढ करण्यात आली होती. हे असे का घडले, अद्याप स्पष्ट नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
>फोक्स वॅगननंतर दुसरे मोठे आंतरराष्ट्रीय प्रकरण
४आपली वाहन विक्री वाढावी म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्या कशी लबाडी करतात, याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. काही महिन्यांपूर्वीच जर्मनीच्या फोक्स वॅगन या कंपनीच्या वाहनांत उत्सर्जन विषयक दोष आढळला होता. आता या प्रकरणात दोष आढळलेल्या सर्व मॉडेल्सचे उत्पादन थांबविण्यात आले आहे. जपानमध्ये अशी प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली होती. यापूर्वी तोशिबा या इलेक्ट्रॉनिक कंपनीने आपल्या लेखा परीक्षणात लबाडी केली होती.

Web Title: False claims about mileage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.