प्रेयसीचा FB वर खोटा मेसेज, 11 वर्षाच्या प्रियकराची आत्महत्या
By admin | Published: April 8, 2017 03:04 PM2017-04-08T15:04:27+5:302017-04-08T15:04:27+5:30
प्रेम म्हणजे मजा नसते आणि त्यातही जर एखाद्या लहानग्याच्या मनासोबत खेळलं तर ते जीवघेणं ठरू शकतं.
Next
>ऑनलाइन लोकमत
डेट्रॉइट , दि. 8 - प्रेम म्हणजे मजा नसते आणि त्यातही जर एखाद्या लहानग्याच्या मनासोबत खेळलं तर ते जीवघेणं ठरू शकतं. अमेरिकेच्या मिशिगन प्रांतात अशीच एक घटना समोर आली आहे.
येथील डेट्रॉइट शहरातील 11 वर्षाच्या मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. टायसन बेन्झ असं त्याचं नाव. बेन्झ याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडने "आपण आत्महत्या करत असल्याचा एक खोटा मेसेज सोशल नेटवर्कींग वेबसाइट फेसबुकवर पोस्ट केला होता. खरंतर मजा म्हणून तिने हा मेसेज पोस्ट केला होता, यामध्ये तिचे मित्रही सहभागी होते. पण तिच्या या मजा म्हणून केलेल्या मेसेजमुळे टायसनचा नाहक जीव गेला.
गर्लफ्रेंडचा फेसबुकवरील मेसेज पाहून टायसन गोंधळला, काय करावं त्याला सुचत नव्हतं, तिच्या मेसेजला उत्तर म्हणून आपणही आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने टाकला. त्यानंतर त्याने स्वतःच्या घरात फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. टायसनच्या आईने दरवाजा उघडला असता त्यांना टायसन लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ त्याला स्थानिक रूग्णालयात नेलं, अखेर मंगळवारी (दि.4)डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.
या घटनेनंतर टायसनच्या कुटुंबाकडून त्याच्या आठवणीत GoFundMe नावाचं वेब पेज बनवलं आहे. सोशल मीडिवरील खोट्या मेसेजबाबत जागरूकता निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश आहे.
सोशल मीडियाद्वारे एखाद्याचा छळ करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी घेणं आवश्यक आहे, सर्वांनी जबाबदार होणं गरजेचं आहे, असं टायसनची आई कॅटरीना गॉस म्हणाल्या. याबाबतीत शाळांनी जबाबदारी घेऊन मुलांना योग्य शिक्षण देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या.