प्रसिद्ध इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचं निधन

By admin | Published: February 20, 2016 06:45 PM2016-02-20T18:45:01+5:302016-02-20T20:02:43+5:30

लेखक अम्बेर्टो इको यांचं निधन झालं आहे. इटालियन वृत्तपत्र ला रिपब्लिकाने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

Famous Italian writer Amberto Echo passed away | प्रसिद्ध इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचं निधन

प्रसिद्ध इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचं निधन

Next
>ऑनलाइन लोकमत -
रोम (इटली), दि. 20 - प्रसिद्ध इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षाचे होते.  इटालियन वृत्तपत्र ला रिपब्लिकाने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 अम्बेर्टो इको गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरमुळे त्रस्त होते.  अम्बेर्टो इको यांची ‘द नेम ऑफ द रोज' ही कादंबरी खुप गाजली होती. अम्बेर्टो इको त्यांनी लिहिलेल्या कादंब-यांसाठी ते नेहमीच वाचकांच्या आठवणीत राहतील.
 त्यांनी लिहिलेल्या ‘फाउकॉल्ट्स पेन्डुलम', ‘द आइलँड ऑफ द डे बिफोर', ‘बाउदोलिनो' आणि ‘द प्राग सेमेटरी' या कादंब-या खुपच लोकप्रिय झाल्या. मात्र त्यांनी लिहिलेली  ‘द नेम ऑफ द रोज'  या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.  ‘द नेम ऑफ द रोज'  या कादंबरीच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. याच कादंबरीवर आधारीत 1986मध्ये चित्रपटदेखील बनवण्यात आला होता.

Web Title: Famous Italian writer Amberto Echo passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.