सेल्फी घेण्याच्या नादात १६० फूट उंचावरून खाली पडली सोशल मीडिया स्टार आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:13 PM2021-08-24T17:13:10+5:302021-08-24T17:19:02+5:30
२३ वर्षीय कुब्रा तिच्या १६ वर्षीय चुलत बहिणीला भेटण्यासाठी इस्तांबुलमध्ये फॅमिली अपार्टमेंटमध्ये गेली होती.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने भलेही अनेक लोकांचं जीवन सोपं केलं असेल, पण टिकटॉक, इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर फेमस होण्याच्या नादात अनेकांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. अशीच एक घटना तुर्कीची टिकटॉक स्टार कुब्रा डोगेनसोबत बघायला मिळाली.
२३ वर्षीय कुब्रा तिच्या १६ वर्षीय चुलत बहिणीला भेटण्यासाठी इस्तांबुलमध्ये फॅमिली अपार्टमेंटमध्ये गेली होती. दोघांनी भेटल्यावर निर्णय घेतला होता की, त्या टिकटॉकसाठी छतावर चढून कंटेंट क्रिएट करतील. कुब्रा सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. त्यामुळे तिला ही आयडिया आवडली.
कुब्राने छताव छढल्यावर ग्रे कलरच्या प्लाटिक कव्हरिंगवर पाय ठेवला. कुब्राने पाय ठेवताच ते प्लास्टिक कवर फाटलं आणि ती १६० फूट खाली पडली. या घटनेनंतर कुब्राची बहीण फारच घाबरली होती आणि तिने लगेच घरात जाऊन परिवारातील लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर इमरजन्सी सेवेला कॉल करण्यात आला. काही मिनिटात टीम पोहोचली. ते कुब्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन होते, मात्र, रस्त्यातच तिने जीव गमावला. दरम्यान खाली पडण्याआधी कुब्राच्या दोन बहिणींनी बरेच व्हिडीओ काढले होते आणि फोटोही काढले होते.
सायंकाळी ७.३० वाजता कुब्रासोबत ही घटना घडली. तिचे काका म्हणाले की, याप्रकरणी ते या छताच्या कॉन्ट्रॅक्टरवर केस करणार आहेत. ते म्हणाले की, या छताबाबत फारच बेजबाबदारपणा झाला आहे. कोणत्याही स्थितीत ते कॉन्ट्रॅक्टरला सोडणार नाही.