ब्राझीलमध्ये भीषण विमान अपघात; ६२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 09:21 AM2024-08-10T09:21:46+5:302024-08-10T09:22:04+5:30
व्हॅलिन्होस शहराच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, या अपघातात कोणी वाचले नाही. एका घरावर हे विमान कोसळले.
नेपाळनंतर ब्राझीलमध्ये मोठा विमानअपघात झाला आहे. प्रवासी विमान कोसळून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ब्राझीलच्या साओ पावलोजवळ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक टीव्ही ग्लोबोन्यूजने म्हटले आहे.
व्हॅलिन्होस शहराच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, या अपघातात कोणी वाचले नाही. एका घरावर हे विमान कोसळले. घरात त्यावेळी कोणी नसल्याने घरातील कोणी व्यक्ती दगावलेली नाही. घराचेही नुकसान झाले आहे.
एटीआर-७२ हे छोटेखानी विमान होते. पराना राज्यातील कास्केव्हेलहून ते साओ पाऊलो येथे ते जात होते. विन्हेडो येथे विमान क्रॅश झाले. विमानात ५८ प्रवासी आणि ४ पायलट, क्रू मेंबर होते. ग्लोबोन्यूजवरील फुटेजमध्ये विमान वेगाने खाली पडत असल्याचे दिसत आहे.