हृदयद्रावक! गेम खेळताना मुलीच्या अंगावर पडले तिचे वडील, तीन वर्षाच्या मुलीने गमावला जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 10:17 IST2021-06-11T10:13:00+5:302021-06-11T10:17:28+5:30
एका वडिलाच्या चुकीमुळे त्याच्या ३ वर्षाच्या मुलीचा जीव गेल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

हृदयद्रावक! गेम खेळताना मुलीच्या अंगावर पडले तिचे वडील, तीन वर्षाच्या मुलीने गमावला जीव!
वडील आणि मुलीचं नातं जगात सर्वात प्रेमळ नातं मानलं जातं. आपल्या मुलीला कोणताही त्रास होऊ नये यासाठी एक वडील जमेल ते प्रयत्न करत असतो. मात्र, कधी कधी वडिलांकडून अशा चुका होतात की, त्या लेकरांसाठी महागात पडतात. एका वडिलाच्या चुकीमुळे त्याच्या ३ वर्षाच्या मुलीचा जीव गेल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
इंग्लंडमध्ये ही घटना घडली. मृत चिमुकली आपले वडील रॉबर्ट फोलेसोबत आपल्या घरासमोरील मैदानात एका उपकरणावर गेम खेळत होती. त्याला सुपरनोवा असं म्हणतात. यादरम्यान वडील चुकून आपल्या मुलीच्या अंगावर पडला आणि यामुळे जखमी होऊन मुलीचा मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, हा गेम खेळताना वडील मुलीवर पडल्यावर तिल डोक्याला आणि मानेला गंभीर इजा झाली होती. इतकंच नाही तर तिच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्यालाही मार लागला होता. वडिलांचं वजन जास्त असल्याने मुलीवर जास्त भार पडला आणि तिच्या नाजूक अवयवांना गंभीर इजा झाली.
न्यूझीलॅंड हेरॉल्डच्या वृत्तानुसार, सुपरनोवा गेम खेळताना मृत मुलगी एम्बरली रिंगच्या वरच्या भागावर बसली होती. तिच्या वडिलांचं संतुलन बिघडलं आणि त्यांनी खाली उडी घेण्याचा प्रयत्न केला. पण अशात ते चुकीच्या दिशेने पडले. तिकडे त्यांची मुलगी होती. त्यांचं वजन पूर्णपणे मुलीवर पडलं आणि त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला.