पित्याने जळत्या घराच्या खिडकीतून मुलाला फेकले, जवानाने 'कॅच' करुन वाचवला जीव;Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 12:54 PM2022-03-09T12:54:02+5:302022-03-09T12:54:24+5:30

एका जळत्या घरातून पित्याने आपल्या पोटच्या पोराला फेकल्याची घटना घडली आहे. न्यू जर्सीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली होती, ...

Father throws child out of burning house window, jawan 'catches' and saves life; Video | पित्याने जळत्या घराच्या खिडकीतून मुलाला फेकले, जवानाने 'कॅच' करुन वाचवला जीव;Video

पित्याने जळत्या घराच्या खिडकीतून मुलाला फेकले, जवानाने 'कॅच' करुन वाचवला जीव;Video

Next


एका जळत्या घरातून पित्याने आपल्या पोटच्या पोराला फेकल्याची घटना घडली आहे. न्यू जर्सीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली होती, यानंतर मुलाचा जीव वाचवण्यासाठी पित्याने त्याला वरच्या मजल्यावरुन फेकले. यादरम्यान खाली उभा असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाने त्याला झेलले आणि त्याचा जीव वाचवला.

न्यू जर्सीच्या साउथ ब्रन्सविक येथील साउथ रिज वुड्स कॉम्प्लेक्समधील दोन मजली अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर भीषण आग लागली. यादरम्यान घरात वडील आणि तीन वर्षांचे मूल अडकले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी वडिलांनी खिडकी तोडून आपल्या तीन वर्षांच्या मुलाला जवानांच्या दिशेने फेकले.

खाली उभे असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या मुलाला झेलले. या घटनेत मूळ पूर्णपणे सुखरूप आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मूल सुखरुप असल्याची खात्री झाल्यानंतर वडीलही खिडकीतून बाहेर आले. सध्या आगीचे कारण शोधले जात आहे. 

Web Title: Father throws child out of burning house window, jawan 'catches' and saves life; Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.