गुलाम महिलांच्या उपभोगाबाबत फतवा

By admin | Published: December 30, 2015 02:23 AM2015-12-30T02:23:26+5:302015-12-30T02:23:26+5:30

गुलाम म्हणून ताब्यात घेतलेल्या स्त्रिया आणि मुलींचा लैंगिक उपभोग कसा घ्यावा याविषयी इस्लामिक स्टेटच्या (इसिस) धार्मिक मार्गदर्शकांनी फतवा जारी केल्याचे समोर आले असून त्यावरून

Fatwas for the consumption of slave women | गुलाम महिलांच्या उपभोगाबाबत फतवा

गुलाम महिलांच्या उपभोगाबाबत फतवा

Next

लंडन : गुलाम म्हणून ताब्यात घेतलेल्या स्त्रिया आणि मुलींचा लैंगिक उपभोग कसा घ्यावा याविषयी इस्लामिक स्टेटच्या (इसिस) धार्मिक मार्गदर्शकांनी फतवा जारी केल्याचे समोर आले असून त्यावरून जगभर संतापाची लाट उसळली आहे. गुलाम महिलांना मिळणाऱ्या अयोग्य वागणुकीस आळा घालण्याच्या नावाखाली इसिस महिला, मुलींच्या लैंगिक गुलामगिरीचे समर्थन करत असल्याचा हल्ला मानवाधिकार संघटनांनी केला, तर अनेक इस्लामी धर्मवेत्त्यांनी इसिस कुराण आणि मोहंमद पैगंबरांच्या शिकवणुकीचा गैरअर्थ लावत असल्याची खरमरीत टीका केली आहे.
अमेरिकेच्या विशेष मोहीम दलाने सिरियात इसिस नेत्याच्या घरावर मेमध्ये धाड टाकून या संघटनेच्या कागदपत्रांचा साठा जप्त केला होता. त्यात या खळबळजनक फतव्याचा समावेश होता. या फतव्याचा क्रमांक ६४ आहे.
इस्लामिक स्टेटस् कमिटी आॅफ रिसर्च अ‍ॅण्ड फतवाज्ने २९ जानेवारी २०१५ रोजी तो जारी केला होता. या फतव्यात इसिससाठी लढणारे आणि गुलाम महिलातील लैंगिक संबंध याबाबतचे धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
इसिसने यापूर्वी २०१४ मध्ये गुलामांना कशी वागणूक द्यायची याबाबत एक पत्रक वितरित केले होते. तथापि, हा फतवा त्यापेक्षा अधिक विस्तृत आहे. महिला गुलामांना वागणूक देण्याबाबत काही बंधूंनी नियमांचे उल्लंघन केले आहे. हे उल्लंघन शरिया कायद्यानुसार मान्य नाही, असे स्पष्ट करून या फतव्यात काही नियम सांगण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Fatwas for the consumption of slave women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.