डीएनए चाचणीमुळे वाचला आवडत्या कुत्र्याचा मृत्युदंड
By Admin | Published: February 17, 2017 12:47 AM2017-02-17T00:47:14+5:302017-02-17T00:47:14+5:30
शेजारच्या कुत्र्याला ठार मारल्याबद्दल जेब या कुत्र्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली. परंतु आपला अतिशय आवडता कुत्रा
न्यूयॉर्क : शेजारच्या कुत्र्याला ठार मारल्याबद्दल जेब या कुत्र्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली. परंतु आपला अतिशय आवडता कुत्रा जेब अशा रितीने ठार मारला जाईल याची कल्पनाही जेबचे मालक सेंट क्लेअर मिशिगनमध्ये वास्तव्यास असलेले पेन्नी आणि केनेथ जॉब करू शकत नव्हते. जेब घरात सात मांजरी व इतर तीन कुत्र्यांसोबत गुण्यागोविंदाने राहात होता. त्याने क्वचितच इतर कुणाला दुखापत केली असेल, त्यामुळे जेबने त्या कुत्र्याला ठार मारले नाही, असे जॉब म्हणायचे.
२४ आॅगस्ट २०१६ रोजी जॉब यांचे शेजारी ख्रिस्तोफर सावा यांना आपला कुत्रा व्लॅड याच्या मृतदेहावर जेब उभा असल्याचे दिसले. व्लॅडचे वजन १४ पौंड तर जेबचे ९० पौंड होते. सावाने व्लॅडच्या मृत्युला जेब जबाबदार असल्याचे ठरवले व जनावरांचे नियंत्रण ठेवणाऱ्या विभागाने जेबचा ताबा घेतला.
व्लॅडचा मृत्यू जेबमुळेच झाला असा निर्णय न्यायालयाने देऊन जेबला जिवंत राहण्याचा हक्क नाही, असे म्हटले होते. जेबला वाचवण्यासाठी व्लॅडच्या अंगावरील जखमा आणि जेबचा डीएनए यांची तपासणी करण्याचा निर्णय जॉब कुटुंबाने घेतला. व्लॅडचा मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवला होता. त्यानुसार जेबच्या डीएनएची तपासणी केल्यावर व्लॅडच्या अंगावरील जखमांशी जेबचा काही संबंध नसल्याचे व्लॅड दुसऱ्याच कोणत्या कुत्र्याकडून ठार मारला गेल्याचे सिद्ध झाले व जेब मृत्युदंडाच्या शिक्षेतून वाचला.