अमेरिकेत पुन्हा गोळीबार, अनेक जण जखमी झाल्याची भीती
By admin | Published: June 14, 2017 10:39 PM2017-06-14T22:39:06+5:302017-06-14T23:51:13+5:30
अमेरिकेतल्या यूपीएस व्हेअरहाऊस आणि ग्राहक सेवा केंद्रामध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
सन फ्रान्सिस्को, दि. 14 - अमेरिकेतल्या यूपीएस व्हेअरहाऊस आणि ग्राहक सेवा केंद्रामध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र लोकल मीडिया रिपोर्टनुसार गोळीबारात अनेक जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिसांनी आजूबाजूचा परिसर बंद केला आहे.
सन फ्रान्सिस्कोमधल्या पोर्टेरो हिल 2.5 मैलांवर ही गोळीबाराची घटना घडली आहे. पोलिसांनी गोळीबार झालेल्या परिसरात जाण्यास मनाई केली आहे. लोकल मीडिया रिपोर्टनुसार गोळीबार करणा-याला ठार करण्यात आलं असून, अनेक नागरिक गोळीबारात जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
(अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोराचा मृत्यू)
तत्पूर्वी अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये काँग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदारावर गोळीबार करणा-याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्टीव्ह स्कॅलीस यांच्यावर बंदुकधारी हल्लेखोराने गोळीबार केला होता. या गोळीबारात स्टिव्ह स्कॅलिस यांच्यासह 5 जण गंभीर जखमी झाले असून, उपचारादरम्यान स्कॅलिस यांना जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यासह किमान 5 जण गंभीर जखमी झाले होते. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनजवळील उपनगरात अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांमध्ये बेसबॉलचा सामना होणार आहे. दरवर्षी अशा स्वरुपाचा सामन्याचे आयोजन केले जाते आणि या सामन्यासाठी बुधवारी सकाळी व्हर्जिनियामध्ये सराव सुरू होता. सरावासाठी अमेरिकी काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्य स्टिव्ह स्कॅलिस आणि अन्य मंडळी उपस्थित होती. अचानक एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केली. ‘स्कॅलिस यांना नीट चालताही येत नव्हतं. घटनास्थळावरुन बाहेर पडतानाही त्यांना त्रास होत होता’ असं अमेरिकी काँग्रेसमधील मॉ ब्रुक्स यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं.