भीती : सामान्य नागरिकांना घरात घुसून मारताहेत सैनिक; गर्भवती महिलेसह अनेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 08:00 AM2024-08-09T08:00:19+5:302024-08-09T08:01:00+5:30

सध्या या भागात प्रादेशिक तणाव वाढला आहे. मात्र, त्यानंतर युद्धविराम करण्यासाठी अनेक जागतिक नेते प्रयत्न करत आहेत...

Fear: Soldiers kill civilians by breaking into their homes; Many died, including a pregnant woman | भीती : सामान्य नागरिकांना घरात घुसून मारताहेत सैनिक; गर्भवती महिलेसह अनेकांचा मृत्यू

भीती : सामान्य नागरिकांना घरात घुसून मारताहेत सैनिक; गर्भवती महिलेसह अनेकांचा मृत्यू


जेरूसलेम : इस्रायल-हमास युद्धातून आश्रय घेत असलेल्या गाझा शहरातील एका घरावर इस्रायली सैनिकांनी हल्ला केल्याने यात किमान सात जण ठार तर एका ५ वर्षांच्या मुलासह दोन गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. सध्या गाझामध्ये गंभीर संकटे निर्माण झाली असून, मृतांची संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे.

सध्या या भागात प्रादेशिक तणाव वाढला आहे. मात्र, त्यानंतर युद्धविराम करण्यासाठी अनेक जागतिक नेते प्रयत्न करत आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणचे अध्यक्ष मसूद यांना फोन करत प्रादेशिक स्थिरतेला कायमचे नुकसान होईल, अशी लष्करी कारवाई टाळण्याची विनंती केली आहे.

नेमके काय झाले?
- मानवाधिकार समितीने म्हटले की, इस्त्रायली सैनिकांनी घरावर हल्ला केला, यात त्यांनी किमान सात जणांना ठार तर ५ वर्षांच्या मुलासह दोन जणांना गंभीर जखमी केले. 
- कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, घरात अतिरेकी, शस्त्रे नव्हती. सैन्याने कोणतीही पूर्वसूचना न देता आत प्रवेश केला, ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहेत.

Web Title: Fear: Soldiers kill civilians by breaking into their homes; Many died, including a pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.