चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 08:49 AM2020-07-14T08:49:36+5:302020-07-14T08:52:54+5:30

आता चीनमध्ये नवंच संकट येऊन धडकलं असून, या संकटानं आतापर्यंत ३.८ लोक प्रभावित झाले आहेत.

Fear spreads new crisis in China; 3.8 crore people affected, 140 killed | चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू

चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू

googlenewsNext

बीजिंगः कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, अनेक देशांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची उत्पत्ती चीनमधून झाल्यानं अनेक देशांचा जिनपिंग सरकारवर रोष आहे. त्यामुळे चीनमध्येही अस्वस्थता आहे. आता चीनमध्ये नवंच संकट येऊन धडकलं असून, या संकटानं आतापर्यंत ३.८ लोक प्रभावित झाले आहेत. चीनमधल्या काही भागात मुसळधार पाऊस पडला असून, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत १४० जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत. 

आतापर्यंत सुमारे 3.8 कोटी लोकांचं या भयंकर आपत्तीत वाईट पद्धतीनं नुकसान झाले आहे. चीन देशातील जवळपास 27 प्रांतांना या आपत्तीचा सामना करावा लागतो आहे. सर्वाधिक प्रभावित भागात जिआंग्सी, अनहुई, हुबेई आणि हुनान प्रांतांचा समावेश आहे. चिनी अधिका-यांनी सांगितले की, पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या भागातून आतापर्यंत सुमारे 22.5 लाख लोकांना वाचविण्यात आले आहे. देशातील पूर नियंत्रण व दुष्काळ निवारण कार्यालयाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या अनेक आठवड्यांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे यांगत्सीसह अनेक नद्यांना पूर आला आहे.
या पुरामुळे 28000 पेक्षा जास्त इमारती नष्ट झाल्या आहेत आणि सुमारे 11.7 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले  आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी नागरिकांना सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश अधिका-यांना दिले आहेत. चीनच्या 433 नद्यांच्या पाण्याचा स्तर जूनच्या सुरुवातीपासूनच धोक्याच्या पातळीवर गेला होता. त्यापैकी 33 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून ऐतिहासिक शिखर गाठलं आहे.  सोमवारपर्यंत यांग्त्जी व हुइहे नदीबरोबरच डोंगिंग, पोयांग आणि तैहू तलाव यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. 

तांगशानमध्ये 5.1 तीव्रतेचा भूकंप
चीनमध्ये आलेला पूर आणि मुसळधार पावसामुळे रविवारी 5.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्कादेखील तांगशान शहराला बसला. भूकंपातून कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देशात नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती गंभीर आहे. पुरामुळे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील कृषी उत्पादनांवरही परिणाम झाला आहे. च्यांगशी प्रांताशिवाय हुपेई आणि हुनान प्रांतातही परिस्थिती गंभीर आहे.

नेपाळमध्ये पूर-भूस्खलनात 60 ठार, 41 बेपत्ता
गेल्या चार दिवसांत नेपाळमधील विविध भागात पूर आणि दरड कोसळल्यामुळे 60 जणांचा मृत्यू झाला आहे तर 41 लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे. पश्चिम नेपाळमधील मायागाडी जिल्ह्यात सर्वाधिक 27 जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी अधिकारी आणि पोलीस कर्मचार्‍यांसह शोध आणि बचावकार्य सुरू आहे. जिल्ह्यात भूस्खलनानं घरं ढिगाऱ्याखाली दबून गेल्याने शेकडो लोक विस्थापित झाले आहेत. प्रभावित नागरिकांनी स्थानिक शाळा आणि समुदाय केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे. मायागडी येथील धौलागिरी ग्रामपरिषदेच्या अध्यक्ष थमसरा पुन यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यात आम्ही जखमींची सुटका केली ज्यामुळे आम्हाला बचावकार्य राबवण्यासाठी सुमारे 3० ते 35 तास लागले.

हेही वाचा

CoronaVirus News : जागतिक स्तरावर परिस्थिती भयंकर; यूरोप अन् आशियातील बरेच देश चुकीच्या मार्गावर- WHO

अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी

Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट

बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे

धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह

हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन

Read in English

Web Title: Fear spreads new crisis in China; 3.8 crore people affected, 140 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन