अफगाण निवडणुकीवर दहशतवादाचे सावट

By admin | Published: June 14, 2014 03:35 AM2014-06-14T03:35:43+5:302014-06-14T03:35:43+5:30

अफगाणिस्तानात शनिवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अंतिम फेरी होत असून, माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अब्दुल्ला व जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ अश्रफ गणी यापैकी एकाची निवड मतदार करणार

Fear of terrorism on Afghan elections | अफगाण निवडणुकीवर दहशतवादाचे सावट

अफगाण निवडणुकीवर दहशतवादाचे सावट

Next

काबूल : अफगाणिस्तानात शनिवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अंतिम फेरी होत असून, माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अब्दुल्ला व जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ अश्रफ गणी यापैकी एकाची निवड मतदार करणार आहेत; पण या निवडणुकीच्या दरम्यान दहशतवादी हल्ले करण्याचे इशारे तालिबानने दिले आहेत. त्यामुळे अफगाण पोलीस व सैनिक आज प्रत्येक कार तपासत आहेत.
शनिवारी होणारे मतदान दुसऱ्या फेरीसाठी आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्य या वर्षाच्या अखेरीस अफगाणमधून बाहेर पडणार असून, त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.
निवडणुकीच्या पहिल्या फेरीत मतदारांनी उत्साहाने मतदान केले होते, त्याचीच पुनरावृत्ती शनिवारी व्हावी अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Fear of terrorism on Afghan elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.