फेडरल बँकेचे व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय

By Admin | Published: June 17, 2016 03:32 AM2016-06-17T03:32:35+5:302016-06-17T03:32:35+5:30

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदी पाहून येथील फेडरल बँकेने आपले धोरणात्मक व्याजदर ‘यथास्थिती’ ठेवण्याचा निर्णय घेतला. फेडरल बँकेची दोनदिवसीय बैठक बुधवारी येथे पार पडली.

Federal Bank's interest rate was 'like' | फेडरल बँकेचे व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय

फेडरल बँकेचे व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदी पाहून येथील फेडरल बँकेने आपले धोरणात्मक व्याजदर ‘यथास्थिती’ ठेवण्याचा निर्णय घेतला. फेडरल बँकेची दोनदिवसीय बैठक बुधवारी येथे पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत विकासाचा अंदाजही घटविण्यात आला.
व्याजदर वाढविल्यास वृद्धीचा दर मंदावू शकतो, असा कयास व्यक्त करून व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय बँकेने घेतला.
बँकेने म्हटले आहे, यंदा व्याजदरात दोनदा वाढ करण्याचा उद्देश कायम आहे. आर्थिक विकासाचे स्पष्ट संकेत मिळत नाहीत, तोवर व्याजदर वाढवले जाणार नाहीत, असे ‘फेड’च्या अध्यक्ष जेनेट येलेन म्हणाल्या. (वृत्तसंस्था)

Web Title: Federal Bank's interest rate was 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.