व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फसली होती टोकदार वस्तू, ती काढल्याने महिला डॉक्टरची गेली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:01 PM2021-12-27T12:01:57+5:302021-12-27T12:02:31+5:30
पीडित डॉक्टरने त्या व्यक्तीला नवं जीवन देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्या व्यक्तीच्या पार्श्वभागात मिसाइलच्या आकाराची एक टोकदार वस्तू अडकली होती.
प्रायव्हेट पार्टमध्ये टोकदार वस्तू गेलेल्या व्यक्तीचा जीव वाचवल्याप्रकरणी एका डॉक्टरला आपली नोकरी गमवावी लागली आहे. डॉक्टरने सांगितलं की, सीनिअर्सच्या षडयंत्रामुळे तिला नोकरीहून काढण्यात आलं. पीडित डॉक्टरने त्या व्यक्तीला नवं जीवन देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्या व्यक्तीच्या पार्श्वभागात मिसाइलच्या आकाराची एक टोकदार वस्तू अडकली होती.
'डेली स्टार यूके'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अमेरिकन (America) कोलोरेक्टल र्जन डेबोरा केलर (American Colorectal Surgeon Deborah Keller) म्हणाल्या की, फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना एका सर्जरीमध्ये मदत करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. एका व्यक्तीच्या पार्श्वभागात अजब टोकदार वस्तू घुसली होती. त्याच्या सर्जरीमध्ये डॉक्टरने मदत केली होती, त्यानंतर अचानक हॉस्पिटल व्यवस्थापनाने तिला सुट्टीवर पाठवलं. तिच्यावर निराधार आरोप लावले. या सर्जरीचा आधार घेत तिच्या सेक्स लाइफवरही कमेंट करण्यात आले.
अफेअरच्या अफवा पसरवल्या
डेबोरा केलर म्हणाला की, 'रूग्णाची देखभाल करणारे प्रमुख सर्जन मार्क कॅलीसोबत माझ्या अफेअरची चर्चा केली गेली. हॉस्पिटल व्यवस्थापनाने असाही आरोप लावला की, मी त्या वस्तूचा फोटो शेअर करून रूग्णाच्या गोपनीयतेचं उल्लंघन केलं. माझ्या सेक्स लाइफवर कमेंट करण्यात आल्या'. केलर म्हणाल्या की, व्यवस्थापनाने त्या वस्तूला चुकीच्या पद्धतीने सादर केलं.
डॉक्टरांना नव्हतं माहीत काय आहे ती वस्तू
डेबोरा यांनी सांगितलं की, हॉस्पिटलच्या डॉक्टरांना माहीत नव्हतं की, रूग्णाच्या पार्श्वभागातून काढण्यात आलेली वस्तू मुळात आहे तरी काय. त्यांनी आरोप केला की, त्यांनी लैंगिक भेदभावाच्या अनेक तक्रारी केल्या, यामुळे तिला टार्गेट करण्यात आलं. डेबोरोने न्यूयॉर्क प्रेस्बिरियन चीफ ऑफ कोलेरेक्टल सर्जरी पोकला रवि किरनवर निशाणा साधत सांगितलं की, रविने त्यांच्याविरोधात अभियान चालवलं.