लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान महिला पत्रकाराला कारने उडवलं, पाहा थरारक व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:27 PM2022-01-21T12:27:35+5:302022-01-21T12:28:08+5:30
हा व्हिडिओ टिमोथी बर्क नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. ही क्लिप 36 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि 28,000 वेळा लाईक करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर अनेकदा पत्रकारांचे लाइव्ह रिपोर्टिंगचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही गंभीर. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका महिला रिपोर्टरला लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान एका कारने टक्कर मारल्याची घडना घडली. सुदैवाने या घटनेत महिलेला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही आणि थोड्या वेळाने तिने आपले काम पुन्हा सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएसएझेड-टीव्हीची रिपोर्टर टोरी योर्गी रस्त्यावरुन लाइव्ह रिपोर्टिंग करत होत्या. तर, स्टुडिओमध्ये अँकर टिम इर होते. या दोघांचे लाइव्ह संभाषण सुरू असताना टोरी यांना पाठीमागून एका कारने जोरदार धडक दिली. सुदैवाने यात टोरी यांना गंभीर दुखापत झाली नाही आणि त्यांनी पुन्हा आपले काम सुरू केले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच, टोरी यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
"We're good, Tim." pic.twitter.com/9kn2YElDLK
— Timothy Burke (@bubbaprog) January 20, 2022
व्हिडिओत नेमके काय आहे ?
व्हिडिओमध्ये टोरी योर्गी डनबर वेस्ट व्हर्जिनियामधील डनबार येथून लाइव्ह रिपोर्टिंग करत होत्या. यावेळी अचानक त्यांना एका कारने जोरदार धडक दिली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. पण यादरम्यान त्यांनी बोलणे थांबवले नाही. "मला नुकतीच एका कारने धडक दिली, पण मी नशीबवान आहे की मी पूर्णपणे बरी आहे'', असे टोरी म्हणाल्या. या घटनेदरम्यान धडक दिलेल्या महिला चालकाने टोरी यांची विचारपूस केली.
व्हिडिओ प्रचंड व्हायरल
हा व्हिडिओ टिमोथी बर्क नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. ही क्लिप 36 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि 28,000 वेळा लाईक करण्यात आली आहे. रिपोर्टरचे कौतुक करताना, एका यूझने म्हटले, "टोरी योर्गी, आज मी 2022 मध्ये टेलिव्हिजनवर पाहिलेली सर्वात सकारात्मक गोष्ट आहे."