विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप, टीचर ऑफ द ईअर ठरलेल्या महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 03:30 PM2022-09-21T15:30:00+5:302022-09-21T15:32:12+5:30

America : आरोपी महिला शिक्षिकेचं नाव लीह क्वीन आहे. ती 43 वर्षांची आहे. गेंट्री इंटरमीडिएट स्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या लीहला 15 सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे.

Female teacher arrested for having romance in office with teenage student | विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप, टीचर ऑफ द ईअर ठरलेल्या महिलेला अटक

विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप, टीचर ऑफ द ईअर ठरलेल्या महिलेला अटक

Next

America : 17 वर्षांच्या एका विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एका महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. ती मुलांना फिजिकल एज्युकेशन शिकवत होती. महत्वाची बाब म्हणजे महिला शिक्षिका त्याच शाळेत साधारण 20 विद्यार्थ्यांना शिकवत होती. इतकंच नाही तर या महिलेला टीचर ऑफ द ईअरचा अवॉर्डही मिळाला होता.

ही घटना अमेरिकेतील आहे. आरोपी महिला शिक्षिकेचं नाव लीह क्वीन आहे. ती 43 वर्षांची आहे. गेंट्री इंटरमीडिएट स्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या लीहला 15 सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे. तिच्या बेकायदेशीर पदार्थांचं सेवन करण्याचाही आरोप लागला आहे. 

साधारण 40 लाख रूपयांच्या दंडानंतर लीह हिला 17 सप्टेंबरला जामिनावर तुरूंगातून सोडण्यात आलं. गेंट्री पोलीस डिपार्टमेंटनुसार, लीहला 2020 मध्ये एक घटनेवरून अटक करण्यात आली आहे. आरोप आहे की, तेव्हा तिने 17 वर्षीय एका विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध  ठेवले होते. पण आता या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. 

पोलिसांनी सांगितलं की, पीडित विद्यार्थ्याच्या आरोपावर त्यांनी बरेच पुरावे जमा केले आहेत. पोलिसांनी हे पुरावे विद्यार्थ्याचे पालक, लीहचा एक्स हसबंड आणि एका माजी शिक्षकाकडून जमा केले. 

लीहवर विद्यार्थ्याला आपल्या घरी बोलवण्याचाही आरोप आहे. पोलिसांना संशय आहे की, लीहने इतरही विद्यार्थ्यांना आपली शिकार बनवलं असेल. अशात पोलिसांनी इतर पीडितांनाही याप्रकरणी समोर येण्यास सांगितलं आहे. 

गेंट्री पब्लिक स्कूल्सचे सुपरिटेंडेंट टेरी डीपोआला यांनी सांगितलं की, लीहला जॉबवरून सस्पेंड करण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, लीह गेंट्री स्कूलमध्ये गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून शिकवत होती.

Web Title: Female teacher arrested for having romance in office with teenage student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.