अमेरिकेची फर्स्ट लेडी न्यूड फोटोशूटने झाली होती फेमस

By admin | Published: November 9, 2016 05:15 PM2016-11-09T17:15:08+5:302016-11-09T17:15:08+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपती बनण्यासोबतच त्यांची तिसरी पत्नी मेलेनिया ट्रम्प या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी बनतील.

Femas was the first Lady Nude fan of photoshoot | अमेरिकेची फर्स्ट लेडी न्यूड फोटोशूटने झाली होती फेमस

अमेरिकेची फर्स्ट लेडी न्यूड फोटोशूटने झाली होती फेमस

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 - डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. ट्रम्प यांच्या राष्ट्रपती बनण्यासोबतच त्यांची तिसरी पत्नी मेलेनिया ट्रम्प या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी(पहिली महिला) बनतील. 
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत लग्नानंतर मेलेनिया यांना अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं आणि त्या तेथील नागरिक बनल्या. मेलेनिया ट्रम्प यांचा जन्म 26 एप्रिल 1970 रोजी स्लोवेनियामध्ये झाला. वयाच्या 16-17 व्या वर्षीच त्यांनी मॉडेलिंग करण्यास सुरूवात केली. 1998 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका फॅशन शो दरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यावेळी मार्ला मेपल्‍स या ट्रम्प यांच्या पत्नी होत्या मात्र दोघे वेगळे राहत होते. त्यावेळी मेलेनिया यांनी ट्रम्प यांना स्वतःचा फोन नंबर देण्यासाही नकार दिला होता. त्यानंतर 1999 मध्ये एका  इंटरव्‍यू दरम्यान डोनाल्ड यांनी मेलेनियासोबतचं नातं सार्वजनिक केलं. त्यावेळी मेलेनियाने एका निवडणुकीत ट्रम्प यांचा प्रचारही केला होता. आमची ट्यूनिंग खूप चांगली आहे. आमच्यात कधी भांडणं होतं नाहीत, भांडण या शब्दाला आम्ही विसरलो आहोत. आम्ही एकमेकांसोबत आहोत आणि एकमेकांसोबतच राहू असं तेव्हा डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.
 
 ट्रम्पसोबत लग्नाआधी मेलेनियाचं नाव मेलेनिया नॉस असं होतं. 2005मध्ये लग्नानंतर त्या मेलेनिया ट्रम्प झाल्या. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इवानाचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हा मेलेनियापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. मेलेनिया आणि डोनाल्डच्या लग्नात बिल आणि हिलरी क्लिंटन हे दोघेही उपस्थित होते. लग्नात मेलेनियाने 1 लाख डॉलरचा ड्रेस परिधान केला होता, हा खास ड्रेस बनवायला 550 तास लागले होते.  
अमेरिकेच्या इतिहासात न्यूड फोटोशूट करणा-या त्या आज पर्यंतच्या पहिल्या फर्स्ट लेडी आहेत. फ्रेंच भाषेतील एका मेन्स मॅगझीनमध्ये मेलेनियाने हा फोटोशूट केलं होतं. त्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. 
 

Web Title: Femas was the first Lady Nude fan of photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.