फिडेल कॅस्ट्रो यांच्या मुलाने केली आत्महत्या, नैराश्येमुळे आत्महत्या केल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 09:17 AM2018-02-02T09:17:13+5:302018-02-02T09:28:59+5:30
क्यूबाचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फिडेल कास्त्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी गुरूवारी सकाळी आत्महत्या केली.
हवाना- क्युबाचे माजी पंतप्रधान आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो डियाज बालार्ट यांनी गुरूवारी सकाळी आत्महत्या केली. क्यूबा मीडियाच्या वृत्तानुसार, डियाज गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते.
डियाज 68 वर्षांचे होते. डियाज यांच्या दिसण्यावर त्यांच्या वडिलांची छाप होती म्हणूनच त्यांना 'फिडेलिटो' बोललं जायचं. डियाज डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र त्याचाही काही विशेष परिणाम न झाल्याने ते काही महिन्यांपासून राहत्या घरीच नैराश्येवर उपचार घेत होते.
डियाज बालार्ट यांचे वडील फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे मोठे क्रांतिकारी नेते होते. त्यांचं निधन 26 नोव्हेंबर 2016 साली वयाच्या 90 व्या वर्षी झालं. कास्त्रो 1959पासून डिसेंबर 1976 पर्यंत क्यूबाचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांनी क्यूबाचं राष्ट्रपतीपद भूषविलं.
कॅस्ट्रो हे क्यूबातील अमेरिकेचं समर्थन असलेल्या फुल्गेंकियो बतिस्ताच्या हुकूशाहीला मुळासकट बाहेर करून सत्तेत आले. त्यानंतर ते क्यूबाचे पंतप्रधान झाले.
1965साली ते क्यूबाच्या कम्युनिस्ट पक्षाचे पहिले सचिव बनले आणि क्यूबाला एकपक्षीय समाजवदी गणतंत्र बनायचं नेतृत्त्व दिवं. 1976मध्ये ते राज्यपरिषद आणि मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष (राष्ट्रपती) बनले. त्यांनी क्यूबाच्या सशस्क्त्र बळाचं कमांडर इन चीफचा पदभार आपल्याकडेच ठेवला. कास्त्रो यांनी हुकूमशाहीला विरोध केला असूनही त्यांचं वर्णन तसंच केलं गेलं.