साठाव्या वर्षी जुळ्यांना जन्म
By admin | Published: October 3, 2016 04:18 AM2016-10-03T04:18:06+5:302016-10-03T04:18:06+5:30
क्लाऊदेत्ते कूक या ६० वर्षांच्या महिलेने आपल्या पहिल्याच बाळंतपणात रविवारी रात्री दोन जुळ््या सुदृढ मुलांना जन्म दिला.
इव्हॅन्सविले : क्लाऊदेत्ते कूक या ६० वर्षांच्या महिलेने आपल्या पहिल्याच बाळंतपणात रविवारी रात्री दोन जुळ््या सुदृढ मुलांना जन्म दिला. हे बाळंतपण शस्त्रक्रियेने व तिच्या बाळंतपणासाठी जी तारीख दिली होती त्याच्या आधी एक महिना झाले आहे. या मुलांची नावे इस्सॅक आणि इसाह अशी आहेत व त्यांचे वजन प्रत्येक पाच पौंडांचे आहे, असे वृत्त डब्ल्यूएफआयईने दिले आहे.
कूक यांची भेट पतीशी दहा वर्षांपूर्वी चर्चमध्ये झाली होती. नऊ वर्षांपूर्वी त्यांना तुमचे वय झाल्यामुळे कधीही आई होऊ शकणार नाही, असे सांगण्यात आले होते. प्रार्थनेमुळे काहीही शक्य होते, असे क्लाऊदेत्ते कूक म्हणाल्या. देवाकडे वय ही काही संख्या नाही. शिवाय मी सुदृढ आणि बांधेसुध आहे. देवासारखेच मला हे माहीत होते की हे मी करू शकते. ते किती कठीण आहे हे काही महत्वाचे नाही. त्याने सगळ््यातून बाहेर काढले, असे कूक म्हणाल्या. (वृत्तसंस्था)
>आयव्हीएफ तंत्र
कूक यांना आयव्हीएफ या तंत्राच्या साह्याने गरोदरपण लाभले. हे जुळे भाऊ मुदतीच्या आधीच जगात आले असले तरी त्यांना घरी जायला आणखी काही आठवडे लागतील.