आणीबाणीसाठी कयानींकडे बोट
By admin | Published: December 24, 2015 12:12 AM2015-12-24T00:12:05+5:302015-12-24T00:12:05+5:30
देशात २००७ मध्ये आणीबाणी लागू करण्यास आपण जबाबदार नसल्याचे सांगत पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान व लष्करप्रमुखांकडे बोट दाखविले आहे.
Next
इस्लामाबाद : देशात २००७ मध्ये आणीबाणी लागू करण्यास आपण जबाबदार नसल्याचे सांगत पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान व लष्करप्रमुखांकडे बोट दाखविले आहे.
३ नोव्हेंबर २००७ रोजी पाकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. याबाबत मुशर्रफांविरुद्ध देशद्रोहाचा खटला सुरू आहे. मुशर्रफ यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (एफआयए) संयुक्त चौकशी पथकाला जवाब देताना माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ कयानी हे यात प्रमुख आरोपी असल्याचे सांगितले. कारण, २७ नोव्हेंबर २००७ रोजी लष्करप्रमुखपदी आरूढ झाल्यानंतर त्यांनी आणीबाणी उठवली नाही, असे मुशर्रफ म्हणाले.(वृत्तसंस्था)