कॅनडाच्या संसदेत गोळीबार करणारा ठार
By admin | Published: October 23, 2014 04:26 AM2014-10-23T04:26:43+5:302014-10-23T04:26:43+5:30
कॅनडाच्या संसदेत व संसद इमारतीबाहेर बुधवारी रायफलधारी हल्लेखोराने मोठा गोळीबार केला. या हल्लेखोराने सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला.
ओट्टावा : कॅनडाच्या संसदेत व संसद इमारतीबाहेर बुधवारी रायफलधारी हल्लेखोराने मोठा गोळीबार केला. या हल्लेखोराने सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला. नंतर हा हल्लेखोर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला.
ओट्टावातील व्यापारपेठेच्या भागाकडील नॅशनल वॉर मेमोरियलच्या सुरक्षा रक्षकावर या हल्लेखोराने गोळीबार केला व नंतर कार ताब्यात घेऊन ती जवळच्याच सेंटर ब्लॉक इमारतीकडे नेली. संसद सदस्य आणि अन्य साक्षीदारांनी संसदेच्या इमारतीत अनेक गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकले व नंतर हल्लेखोर इमारतीतच मरण पावला, असे कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने (सीबीसी) वृत्त दिले. एकापेक्षा जास्त हल्लेखोर असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे
सीबीसीने म्हटले.
संसद इमारत परिसरात आणखी काही ठिकाणी गोळीबार झाला. गोळीबारात आणखी कोणी जखमी झाले की नाही हे समजू शकले नाही; परंतु पार्लमेंट हिलच्या पूर्वेकडील चटाऊ लॉरिअर हॉटेलमध्ये काही जण रुग्णवाहिका (स्ट्रेचर) नेताना दिसले.