फिजी देशाला चक्रीवादळाचा धोका
By admin | Published: February 20, 2016 09:00 PM2016-02-20T21:00:52+5:302016-02-20T21:00:52+5:30
फिजी देशाला चक्रीवादळाचा धोका असल्याची सुचना देण्यात आली आहे. त्यामुळे फिजीमध्ये या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
फिजी, दि. 20 - फिजी देशाला चक्रीवादळाचा धोका असल्याची सुचना देण्यात आली आहे. त्यामुळे फिजीमध्ये या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. या वादळाला 'सायक्लॉन विन्स्टन' नाव देण्यात आले आहे. हे वादळ सध्या फिजी देशाच्या मुख्य बेटावर धडकले असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी सकाळपर्यंत हे वादळ फिजीमध्ये धडकू शकते. हे वादळ खुपच शक्तिशाली असून या वादळात 320किमी ताशी वेगाने वारे वाहतात. या वादळात मुसळधार पाऊस पडतो तसंच 40 फुट उंच लाटा वाहतात.
सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर सर्व विमाने रद्द करण्यात आली आहेत. तसंच बचावकार्य केंद्राना सक्रीय करण्यात आलं असून कर्फ्यूदेखील लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान फ्रँक यांनी देशवासियांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्वांनी एकत्र राहाव तसंच एकमेकांची काळजी घ्या, जागृत आणि तयार राहा असंदेखील पंतप्रधानांनी सांगितलं आहे. सायक्लॉन विन्स्टनने फिजीमधील बेटांना नेस्तानाभूत केलं आहे. मात्र नेमकं किती नुकसान झालं आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.