एका फाइलमध्ये बंद आहे नेताजींच्या मृत्यूचं रहस्य, इतिहासकाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 06:06 PM2017-11-30T18:06:57+5:302017-11-30T19:48:42+5:30

चेन्नई- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येच्या पुराव्यासंदर्भातील महत्त्वाची फाईल 100 वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य दडलं असल्याचा दावा एका इतिहासकारानं केला आहे.

A file is closed in the secret of Netaji's death, a historian claims | एका फाइलमध्ये बंद आहे नेताजींच्या मृत्यूचं रहस्य, इतिहासकाराचा दावा

एका फाइलमध्ये बंद आहे नेताजींच्या मृत्यूचं रहस्य, इतिहासकाराचा दावा

googlenewsNext

चेन्नई- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येच्या पुराव्यासंदर्भातील महत्त्वाची फाईल 100 वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य दडलं असल्याचा दावा एका इतिहासकारानं केला आहे. पॅरिसमध्ये ख्यातनाम इतिहासकार जे. बी. पी. मोर यांनी फ्रान्सच्या लष्करी अधिका-यांकडे एक गुप्त फाईल पाहण्याची परवानगी मागितली होती. परंतु फ्रान्सच्या राष्ट्रीय अभिलेखाकार प्रशासनानं फाईल दाखवण्यास नकार दिला.

या फाईलमध्ये नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील अनेक रहस्य दडलेली आहेत. फ्रान्स लष्करानं ही फाईल 100 वर्षांसाठी बंद केली आहे, अशी माहिती जे. बी. पी. मोर यांनी दिली आहे. ते म्हणाले, बोस यांचा मृत्यू सायगॉनमध्ये झाल्याचा मी दाव्यानिशी सांगू शकतो. फ्रेंच सिक्रेट सर्व्हिसच्या रेकॉर्डच्या आधारे त्यांचा मृत्यू व्हिएतनामच्या बोट कॅटिनेट जेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. मोर हे पॅरिसमधील एका  कॉलेजमध्ये शिकवतात. फ्रेंच अधिका-यांच्या एका पत्रानं मी आश्चर्यचकितच झालो. त्यांनी मला सायगॉनमध्ये आयएनए आणि बोस यांच्याशी संबंधित माहिती असलेली फाईल पाहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळेच मी दाव्यानिशी सांगू शकतो की, सप्टेंबर 1945मध्ये बोस यांनी सायगॉनमध्ये अखेरचा श्वास घेतला.

या कारणामुळे ही फाईल गुप्त ठेवण्यात येत आहे. मोर यांच्या मते, आता बोस परिवारातील सदस्य किंवा भारत सरकारनं फ्रान्स सरकारशी ही फाईल पुन्हा उघड करण्याची मागणी केली पाहिजे. त्या फाईलला मोठ्या काळापासून जनतेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या फाईलमधून बोस यांच्या शेवटच्या दिवसांसंबंधीची महत्त्वाची माहिती मिळू शकते. खरं तर 11 डिसेंबर 1947च्या फ्रेंच सिक्रेट सर्व्हिसच्या रिपोर्टवरूनच मोरी यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय अभिलेखागारांकडे ही फाईल पाहण्याची परवानगी मागितली होती. बोस यांचा मृत्यू हवाई दुर्घटनेत झाल्याच नसल्याचा दावा मोर यांनी केला आहे. जर त्यांचा मृत्यू हवाई दुर्घटनेत झालाय, तर त्यांच्या अस्थींचं डीएनए चाचणी घेणं गरजेचं होतं. जेणेकरून बोस यांच्या मृत्यू हवाई दुर्घटनेतच झाल्याचं स्पष्ट झालं असतं. डीएनए चाचणी न झाल्यामुळे त्या बोस यांच्या अस्थी नसण्याची शक्यता आहे, असंही जे. बी. पी. मोर म्हणाले आहेत.   

Web Title: A file is closed in the secret of Netaji's death, a historian claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.