Sunita Williams VIDEO: अखेर तब्बल 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर 'ड्रॅगन'चं यशस्वी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 04:05 IST2025-03-19T04:03:29+5:302025-03-19T04:05:04+5:30
Sunita Williams Return Video: अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर तब्बल ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत.

Sunita Williams VIDEO: अखेर तब्बल 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर 'ड्रॅगन'चं यशस्वी लँडिंग
Sunita Williams Return Video: अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) अखेर तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झाले. हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्ववर परतल्या आहेत.
सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना घेऊन पृथ्वीवर परतलेले ड्रॅगन कॅप्सूल रिकव्हरी जहाजावर लोड करण्यात आले आहे. यानंतर आता एक-एक करून परतलेल्या सर्व चारही अंतराळ विरांना बाहेर काढले जाईल आणि त्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाईल
#WATCH | Splashdown succesful. SpaceX Crew-9, back on earth.
— ANI (@ANI) March 18, 2025
After being stranded for nine months at the International Space Station (ISS), NASA's Boeing Starliner astronauts Sunita Williams and Barry Wilmore are back on Earth.
(Source - NASA TV via Reuters) pic.twitter.com/1h8pHEeQRq
यासंदर्भात नासाने चारही अंतराळविरांचा पृथ्विवर परतल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. यात स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिवादन करताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत नासाने, "पृथ्वीवर परतल्यानंतर Crew9 ची पहिली झलक आपल्याला बघायला मिळत आहे! आता रिकव्हरी पथके ड्रॅगनमधून बाहेर येण्यासाठी क्रूला मदत करतील, ही दीर्घकाळाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर सर्व क्रू सदस्यांसाठी असलेली एक मानक प्रक्रिया आहे," असे लिहिले आहे.
We're getting our first look at #Crew9 since their return to Earth! Recovery teams will now help the crew out of Dragon, a standard process for all crew members after returning from long-duration missions. pic.twitter.com/yD2KVUHSuq
— NASA (@NASA) March 18, 2025
खरे तर, सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अथवा स्टेशनवर (आयएसएस) वर पोहोचले होते. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचाच होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना 9 महिने तेथे थांबावे लागले. यानंतर आता ते पुन्हा पृथ्वीवर परतले आहेत. आपल्या मिशनच्या या दीर्घकाळात त्यांनी विविध प्रकारची कामे केली.
हेही वाचा - पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? पाहा VIDEO
या दोघांनी साधारणपणे फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या या अंतराळ स्थानकाची देखभाल आणि स्वच्छता केली. याशिवाय, त्यांनी येथील जुनी उपकरणे बदलली आणि काही वैज्ञानिक प्रयोगही केली.