आर्थिक मंदीचा फटका, सरकारकडून फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवर 'टॅक्स'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 05:42 PM2019-10-20T17:42:19+5:302019-10-20T17:43:12+5:30
सरकारने व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलिंगवर टॅक्स आकारण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियाचा वापर आजच्या जमान्यात अनिवार्य बनला आहे. त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्ट्राग्राम ही माध्यमं सर्वात प्रभावी आहेत. आजच्या जमान्यात व्हॉट्सअॅपचा वापर न करणारा सापडणे क्विचितच शक्य आहे. सध्या तरी सोशल मीडियाचा वापर मोफतच करण्यात येत आहे. केवळ इंटरनेटच्या रिचार्जवर हे फिचर्स वापरण्यात येतात. मात्र, यावर सरकारने टॅक्स लावायला सुरुवात केल्यास काय होईल?. देशातील आर्थिक मंदीमुळे लेबनान सरकारने सोशल मीडियावरील फेसबुक आणि व्हॉट्अप फिचर्सवर टॅक्स घेण्यास सुरुवात केली होती.
लेबनान येथील सरकारने व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलिंगवर टॅक्स आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर, लेबनानची राजधानी बेरुत येथील जनतेने रस्त्यावर उतरून सरकारच्या या धोरणाचा निषेध नोंदवला. रस्त्यावरुन विमानतळापर्यंत अनेकांनी हिंसक स्वरुपात आपला विरोध दर्शवला. आंदोलकांनी रस्त्यावर गाडीचे टायर जाळले, तर काही गाड्यांना आग लावली. या आंदोलनाच्या घटनेत आत्तापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 40 पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक जमखी झाले आहेत.
लेबनान सरकराची आर्थिकस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारला अर्थसंकल्पासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. या कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी सरकारने फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप व्हाईल कॉलिंगवर प्रतिमहा 150 रुपये कर आकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, जनतेच्या तीव्र विरोधानंतर सरकारला हा निर्णय रद्द करावा लागला आहे. त्यामुळे सरकारला जनेतपुढे झुकावे लागल्याचं दिसून येतंय.