'ती' बातमी फुटलीच कशी, 5 दिवसांत शोध लावा - पाक लष्कर
By admin | Published: October 17, 2016 12:25 PM2016-10-17T12:25:29+5:302016-10-17T13:13:06+5:30
पाकिस्तानचे सरकार आणि लष्करात सर्जिकल स्ट्राईकबाबत झालेल्या गुप्त बैठकीतील माहिती 'द डॉन' वृत्तपत्राला कळलीच कशी, याचा शोध पाच दिवसात लावावा, असे पाकिस्तानी लष्कराने नवाज शरीफ सरकारला सांगितले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 17 - पाकिस्तानचे सरकार आणि लष्करात सर्जिकल स्ट्राईकबाबत झालेल्या गुप्त बैठकीतील माहिती 'द डॉन' वृत्तपत्राला कळलीच कशी, याचा शोध पाच दिवसात लावावा, असे पाकिस्तानी लष्कराने नवाज शरीफ सरकारला सांगितले आहे. तसेच या बैठकीतील माहिती फुटण्याचे खापरही तेथील लष्कारने नवाज शरीफ यांच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या शोध लावण्याचासाठी सरकारला पाच दिवसांचा कालावधी दिला आहे.
14 ऑक्टोबरला पाकिस्तान लष्कराचे प्रमुख राहील शरीफ यांची लष्कारतील वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील माहिती फुटण्यास लष्कराने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना जबाबदार धरले आहे. तसेच 'द डॉन' वृत्तपत्रात सायरिल अलमिडा यांनी 'पाक सरकार आणि लष्करामधील मतभेदाची छापलेली बातमीदेखील बनावट आणि कथित आहे', असा कांगावा देखील पाकिस्तानी लष्कराने केला आहे. अशा कथिक आणि बनावट बातम्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असेही पाक लष्कराने म्हटले आहे.
आणखी बातम्या
दरम्यान, 'संबंधित बातमीची तीन वेळा खात्री करुन घेतली होती, त्यानंतरच बातमी छापण्यात आली', असे स्पष्टीकरण डॉन वृत्तपत्राचे पत्रकार सायरिल अलमिडा यांनी दिले आहे. ही बातमी प्रसारित झाल्यापासून पाकिस्तानचे लष्कर अडचणीत आले आहे. त्यामुळे बातमी फुटण्याचे खापर लष्कराने नवाज सरकारवर फोडले आहे. शिवाय, 3 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीतील माहिती पत्रकार अलमिडा यांना मिळालीच कशी? याचा शोध लावण्यासाठी सरकारला 5 दिवसांचा कालावधी दिला आहे. दरम्यान, द डॉन च्या संपादकांनीही, 'वस्तुस्थितीबाबत तपासणी केल्यानंतरच पुष्टी दिली जाते', असे म्हणत बातमीचे समर्थन केले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे सरकार आणि लष्करामध्ये मतभेद नाहीत, सारे काही आलबेल आहे, असे कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्यातील मतभेद वारंवार समोर येत आहेत.