पठाणकोट हल्ल्याचे सत्य शोधा
By Admin | Published: January 11, 2016 02:47 AM2016-01-11T02:47:25+5:302016-01-11T02:47:25+5:30
पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्यामागील हात शोधून काढण्यास अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सांगितले.
वॉशिंग्टन : पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्यामागील हात शोधून काढण्यास अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सांगितले. केरी यांनी हल्ल्यामागील सूत्रधारांवर कारवाई करण्यास दबाब वाढविण्यासाठी शरीफ यांच्याशी रविवारी दूरध्वनीवर चर्चा केली. विभागातील दहशतवादाच्या वाढत्या धोक्याकडेही लक्ष देण्यास त्यांना केरी यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, केरी आणि शरीफ यांच्यात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाच्या द्विपक्षीय विषयांवर आणि विभागात वाढत्या दहशतवादाच्या संकटाकडे लक्ष केंद्रित करण्यावर चर्चा झाली.
पठाणकोट हल्ल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात उच्चस्तरीय नेत्यांच्या पातळीवर झालेली ही पहिलीच बोलणी आहे.
इस्लामाबादेत पंतप्रधानांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पठाणकोट हल्ल्यामागील सत्य शोधून काढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिका सहकार्य देण्यास तयार आहे.
शरीफ यांनी केरी यांना आम्ही पारदर्शक चौकशी करीत असून, सत्य आम्ही समोर आणू, असे सांगितले.
पठाणकोट हल्ल्याचा कट पाकिस्तानातील काही लोकांनी व गुप्तचर संस्थेने घडवून आणल्याचे भारतीय गुप्तचर संस्थांनी म्हटल्यानंतर केरी व शरीफ यांची चर्चा झाली. भारताने पाकिस्तानला ‘विशिष्ट’ आणि ‘कारवाई योग्य’ अशी माहितीही उपलब्ध करून दिली आहे. पाकिस्तानने मात्र स्पष्ट स्वरूपातील पुराव्यांची गरज असल्याचे म्हटले.
शरीफ यांचे सल्लागार (परराष्ट्र व्यवहार) सरताज अजीज यांनी शनिवारी इस्लामाबादेत सांगितले की, परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा ‘सुरक्षित’ आहे. ही चर्चा १५ जानेवारी रोजी ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे अजीज यांनी लाहोरमध्ये कार्यक्रमातही सांगितले.1 भारत आणि पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र सचिव पातळीवर नियोजित बोलणी उधळून लावण्यासाठी पठाणकोट हल्ला करण्यात आला असला तरीही ही बोलणी होतील, अशी आशा केरी यांनी शरीफ यांच्याशी बोलताना व्यक्त केली, असे किर्बी म्हणाले. 2 क्षेत्रात स्थैर्य टिकून राहण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्या चर्चा सुरू राहणे आवश्यक आहे. शरीफ यांनी कोणत्याही देशात दहशतवादी हल्ले करू देण्यास आम्ही आमच्या भूमीचा वापर करू देणार नाही, असे यावेळी सांगितले.3 परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेसाठी नवाज शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली होती. २५ डिसेंबर रोजी मोदी यांनी नवी दिल्लीला येताना लाहोरला जाऊन शरीफ यांची भेट घेतली होती.