सॅन डिएगो : अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेला आग, 21 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:27 PM2020-07-13T12:27:34+5:302020-07-13T12:55:42+5:30
सांगण्यात येते की, या घटनेत जखमी झालेले लोक ठीक आहेत. यासंदर्भात नेव्हल सर्फेस फोर्सेसने ट्विट करत म्हटले आहे, की सर्व क्रूंना जहाजातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच सर्व जण सुरक्षित आहेत.
लॉस एंजलिस -कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो येथे अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेत एका बाजूला अचानक आग लागली. यामुळे जहाजावर धावपळ उडाली. या अपघातात 17 नाविक आणि चार नागरिकांसह एकूण 21 जण जखमी झाल्याची माहिती संबंधित अधिकार्यांनी दिली आहे. सिन्हुआ वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नेव्हल सरफेस फोर्सेस, यूएस पॅसिफिक फ्लीटच्या मते, यूएसएस बोनहोमे रिचर्डच्या बोर्डात ही आग लागली होती. यानंतर जखमी झालेल्या लोकांना स्थानीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सांगण्यात येते की, या घटनेत जखमी झालेले लोक ठीक आहेत. यासंदर्भात नेव्हल सर्फेस फोर्सेसने ट्विट करत म्हटले आहे, की सर्व क्रूंना जहाजातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच सर्व जण सुरक्षित आहेत. ट्विट नुसार, सकाळच्या सुमारास साधारणपणे 8.30 वाजता ही आग लागली. यावेळी जहाजावर जवळपास 160 नाविक उपस्थित होते. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
https://t.co/v2c9T7z09Spic.twitter.com/0hdDCnsX5T
— Naval Surface Forces (@SurfaceWarriors) July 12, 2020
स्थानीय वृत्त संस्थांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांच्या हवाल्याने म्हटले आहे, की त्यांना एक स्फोट ऐकायला आला. आग लागल्यानंतर बराच वेळ नौकेवर धूर दिसत होता. जवळपास अर्धाडझन अग्नीशामक बोटींच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर
CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'