इजिप्तमध्ये बंदुकधाऱ्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, 26 जणांचा मृत्यू
By admin | Published: May 27, 2017 07:00 AM2017-05-27T07:00:58+5:302017-05-27T07:24:12+5:30
मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधाऱ्यांनी चालू बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले आहेत
ऑनलाइन लोकमत
काहिरा, दि. 27- मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधाऱ्यांनी चालू बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी कॉप्टिक ईसाइ (ख्रिस्ती) ला घेऊन जाणाऱ्या एका बसवर गोळीबार झाला. यामध्ये मृत झालेल्यात लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. ईसाइ (ख्रिस्ती) समाजावर झालेला हा या दोन महिन्यातील दुसरा मोठा हल्ला आहे.
काहिरावरुन 250 किमी दक्षिण भागात अंबा शमुवेल मोनेस्ट्रीकडे जात असताना बंधुकधाऱ्यांनी हा हल्ला केल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले. मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप या हल्याची जबाबदारी कोणही घेतलेली नाही. सुरक्षा दलांनी याचा तपास सुरु केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, जवानांच्या पोशाखात असलेल्या आठ ते दहा जणांनी चालू बसवर गोळीबार केला. यावेळी तिथे मृत्यूचे तांडव उभे राहिले होते. सगळीकडे कर्कश आवाज येत होता. इजिप्तमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली होती. टंटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला होता.