Bangladesh : सहा मजली इमारतीला लागली भीषण आग, 52 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 03:43 PM2021-07-09T15:43:59+5:302021-07-09T18:06:45+5:30

Fire in Bangladesh Factory: जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीतून घेतल्या उड्या

A fire broke out in a six-storey building, killing 40 people in dhaka, bangladesh | Bangladesh : सहा मजली इमारतीला लागली भीषण आग, 52 जणांचा मृत्यू

Bangladesh : सहा मजली इमारतीला लागली भीषण आग, 52 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देअनेकजण जखमी असल्यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होऊ शकते


ढाका: बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये शुक्रवारी भीषण दुर्घटना घडली. येथील एका 6 मजली फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याने 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीमधून खाली उड्या घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही भीषण आग फॅक्टरीच्या वरच्या मजल्यावर लागली. इमारतीच्या आत अजूनही काही लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

अग्नीशमन दलाने आणि पोलिसांनी सांगितल्यानुसार, गुरुवारी सायंकाळी 5 वाजता रूपगंज परिसरातील फूड अँड बेवरेज फॅक्टरीमध्ये ही भीषण आग लागली. शुक्रवारी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. आतापर्यंत 25 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अनेकजण जखमी असल्यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होऊ शकते. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आतील परिस्थिती स्पष्ट होईल.

अपघातावेळी फॅक्टरीत अनेकजण होते
या दुर्घटनेतून वाचलेल्या एका मजुराने सांगितले की, आग लागली तेव्हा फॅक्टरीमध्ये अनेक मजुर काम करत होते. दुसऱ्या एका मजुराने सांगितले की, आग लागली तेव्हा पायऱ्यांवरुन येणारे दरवाजे बंद होते, त्यामुळे अनेकजण आत अडकले.

यापूर्वी अनेकदा घडल्या घटना

दरम्यान, अपुऱ्या सुरक्षेमुळे आग लागण्याच्या किंवा इमारत कोसळण्याच्या घटना बांग्लादेशमध्ये यापूर्वीही घडलेल्या आहेत. 2013 मध्ये सर्वात मोठ्या इमारत दुर्घटनेत राणा प्लाझा नावाची इमारत कोसळून 1,100 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच, मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ढाकामधील काही अपार्टमेंटमध्ये आग लागून 70 जणांनी आपले प्राण गमावले होते.

Web Title: A fire broke out in a six-storey building, killing 40 people in dhaka, bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.