मेक्सिकोमध्ये फटाके बाजाराला भीषण आग

By admin | Published: December 22, 2016 01:01 AM2016-12-22T01:01:18+5:302016-12-22T01:01:18+5:30

मेक्सिकोमधील सर्वात मोठ्या फटाका बाजारात झालेल्या स्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला असून, ७२ हून जास्त लोक जखमी झाले

Fire crackers in Mexico fire | मेक्सिकोमध्ये फटाके बाजाराला भीषण आग

मेक्सिकोमध्ये फटाके बाजाराला भीषण आग

Next

मेक्सिको : मेक्सिकोमधील सर्वात मोठ्या फटाका बाजारात झालेल्या स्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला असून, ७२ हून जास्त लोक जखमी झाले आहेत.
राजधानी मेक्सिकी शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सेन पल्बिटो येथील फटाका बाजारात हा प्रकार घडला. येथील एका मोकळ्या मैदानात हा बाजार भरवला जातो. सुरुवातीला एका स्टॉलला आग लागली होती. त्यानंतर ही आग धुमसत गेल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
ख्रिसमस आणि नववर्ष साजरा करण्यासाठी लोकांची फटाके घेण्यासाठी गर्दी झालेली असतानाच ही दुर्घटना घडली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तास लागले. आगीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, संपूर्ण बाजार जळून खाक झाला आहे.

३00 दुकाने जळून खाक

आतषबाजीच्या फटाक्यांमुळे आकाशात विविधरंगी ज्वाळा दिसत होत्या. सप्टेंबर २00५ मध्ये मेक्सिकोच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाआधी काही स्फोट झाले होते. त्यातही अनेक लोक जखमी झाले होते.

Web Title: Fire crackers in Mexico fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.