Fire in Mexico Detention Centre: मेक्सिकोतील इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये अग्नितांडव; 39 लोकांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:33 PM2023-03-28T20:33:51+5:302023-03-28T20:37:34+5:30
Fire in Mexico Detention Centre: अमेरिकन बॉर्डरजवळ उत्तर मेक्सिकोत ही दुर्दैवी घटना घडली.
Fire in Mexico Detention Centre: अमेरिकेच्या शेजारील देश मेक्सिकोमध्ये एक मोठी जीवघेणी घटना घडली आहे. टेक्सासच्या एल पासोजवळील सिउदाद जुआरेझ येथील इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये भीषण आग लागली. या घटनेत 39 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. परप्रांतीयांना येथे कोठडीत ठेवण्यात आले होते. आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
मेक्सिको अमेरिकेच्या दक्षिणेला आहे. या दोन देशांची हजारो किलोमीटरची सीमा आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत येणाऱ्या लोकांना सीमेजवळील इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले जाते. टेक्सासमधील या सेंटरमध्ये अचानक आग लागली, यात 39 लोकांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले.
या घटनेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये अनेक व्हॅन जळालेल्या लोकांना घेऊन जाताना दिसत आहेत.
एकीकडे रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे पथक अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात गुंतले होते, तर दुसरीकडे मृतांचे मृतदेह उचलण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत अनेक मृतदेह शवागारात पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत जळालेल्या काही लोकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपचारात मदत करण्यासाठी अमेरिकन डॉक्टरांची टीमही पोहोचली आहे. या घटनेतील बहुतांश मृत व्हेनेझुएलातील आहेत.