VIDEO-भल्यामोठ्या पाळण्यात बसणं बेतलं जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 03:50 PM2017-07-28T15:50:59+5:302017-07-28T15:55:42+5:30
भल्यामोठ्या पाळण्यात बसणं आणि धमाल करणं हा अनुभव नेहमीच सगळे घेत असतात.मोठमोठ्या पाळण्यात बसून थरार अनुभवण्याची अनेकांना आवड असते. थरार आणि मज्जा असा दुहेरी अनुभव मोठमोठ्या पाळण्यात बसल्यावर घेता येतो.
ओहिओ, दि. 28- भल्यामोठ्या पाळण्यात बसणं आणि धमाल करणं हा अनुभव नेहमीच सगळे घेत असतात.मोठमोठ्या पाळण्यात बसून थरार अनुभवण्याची अनेकांना आवड असते. थरार आणि मज्जा असा दुहेरी अनुभव मोठमोठ्या पाळण्यात बसल्यावर घेता येतो. पण ही धमाल अनेकदा लोकांच्या जीवावरही बेतू शकतं. असाच एक वाईट अनुभव आहिओच्या जत्रेत आला.ओहिओ स्टेट फेअरमध्ये बुधवारी लोक ‘द फायर बॉल अम्युझमेंट राईड’मध्ये बसून थरार अनुभवत होते. पण याचवेळी एक दुर्दैवी घटना घडली. हा पाळणा हवेत झोकावत असताना एका खांबाला जोरदार धडकला. यामुळे पाळण्याचा काही भाग थेट 50 फूट खाली कोसळला.. या दुर्घटनेत एकाचा मृत्यूही झाला. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झालीय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे अगदी स्पष्टपणे व्हिडीओत दिसतं आहे. या दुर्घटनेत एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
द फायर बॉल राईड हे पेंडूलमसारखं असून ते एकाबाजूने दुसऱ्या जातं. या राइडमध्ये पाळणा जमिनीपासून 40 फूट उंच जातो आणि एक मिनिटांत 13 फेऱ्या होतात. या राईडमध्ये चार सीटचे सहा सेक्शन असतात. अनेकांना अशा राईडमध्ये बसून थरार आणि मज्जा अनुभवण्याची आवड असते. पण हा थरार कधी कधी जीवावर बेतू शकतं, हे ओहिओतील दुर्घटनेवरुन समोर आलं आहे.
हा अपघात ओहिओमध्ये घडलेला सगळ्यात वाईट अपघात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आहे. ‘द फायर बॉल अम्युझमेंट राईड'मध्ये 'फायर बॉल राईड' ही सगळ्यांचं आकर्षण ठरतो. तेथे भेट देणारे पर्यटक आवर्जून त्या राइडचा थरार अनुभवण्यासाठी जातात. पण तेथे बुधवारी घडलेल्या घटनेनंतर बऱ्याच पर्यटकांनी त्या राइडमध्ये न जाणं पसंत केल्याची माहिती समोर येते आहे.
या अपघातात ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याने नुकतंच फ्रॅन्किन हाइट्स हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं होतं.
Video: Fire Ball ride malfunctioned at Ohio State Fair..nationwide shutdown.. #socialmedia#rt#breaking#newspic.twitter.com/3jznDZtVx0
— My2Cents (@IndepenObserver) July 27, 2017