रशियाजवळ तेल-गॅस अदलाबदलीवेळी दोन जहाजांना लागली आग; 11 खलाशी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:21 PM2019-01-22T13:21:06+5:302019-01-22T13:21:37+5:30
दोन्ही जहाजांवर 15 भारतीय खलाशी होते
मॉस्को : क्रिमियाला रशियापासून वेगळे करणाऱ्या कर्चच्या समुद्रात दोन तेलवाहू जहाजांना लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 9 जण बेपत्ता आहेत. रशियन पाणबुडे त्यांचा शोध घेत आहेत. या दोन्ही जहाजांवर 15 भारतीय खलाशी होते, असे वृत्त आहे.
कर्चच्या समुद्रात टांझानियाची ही दोन जहाजे उभी होती. एका जहाजातून लिक्विवाईड नॅचरल गॅस दुसऱ्या जहाजात भरला जात होता. यावेळी आग लागल्याचे समजते. रशियाची न्यूज एजन्सी तासनुसार एका जहाजावर 17 जण होते. यामुध्ये तुर्कस्तानचे 9 आणि 8 जण भारतीय होते. तर दुसऱ्या जहाजावर 15 जण होते. यामध्ये तुर्कस्तानचे 7 आणि भारताचे 7 जण होते. तर एकजण लिबियाचा इंटर्नम्हणून काम करत होता.
जहाजातून मालवाहू टाकीमध्ये गॅस भरत असताना मोठा स्फोट झाला आणि दोन्ही जहाजांना आगीने घेरले. जवळपास 35 जणांनी प्राण वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतली. यापैकी 12 जणांना वाचविण्यात आले आहे. तर 9 जण अद्याप बेपत्ता आहेत.