ट्युनिशियातील दोन हॉटेलवर गोऴीबार, २७ ठार
By Admin | Published: June 26, 2015 07:04 PM2015-06-26T19:04:35+5:302015-06-26T20:28:02+5:30
ट्युनिशियातील पर्यटन स्थळ असलेल्या बीचजवऴील दोन हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोऴीबारात जवळजवळ २७ जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
>ऑनलाइन लोकमत
ट्युनिस, दि. २६ - ट्युनिशियातील पर्यटन स्थळ असलेल्या बीचजवळील दोन हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोऴीबारात जवळजवळ २७ जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील ट्युनिशियन ट्युरिस्ट हॉटेल आणि इम्पेरिअल मराहबा हॉटेलमध्ये दहशतवादी घुसले आणि त्यांनी हॉटेलमध्ये असलेल्या लोकांवर गोळीबार केला. या गोळीबार आत्तापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोऴीबार करणा-या एका दहशतवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, हा हल्ल्यामागचा सुत्रधार कोण आहे याचा शोध अद्याप लागला नाही.
या हल्ल्याआधी कुवेतमध्ये मश्जिदवर बॉम्बस्फोट झाला, या स्फोटाची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. तसेच फ्रान्समध्ये कारखान्यावर करण्यात आलेल्या हल्लात इसिसचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.