बलुचिस्तानमध्ये नॅशनल पार्टीच्या ताफ्यावर गोळीबार; एक नेता ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 09:34 PM2019-08-17T21:34:08+5:302019-08-17T21:34:36+5:30

हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी ताफ्यावर जोरदार गोळीबार केला.

firing on Balochistan National Party's convoy; leader killed | बलुचिस्तानमध्ये नॅशनल पार्टीच्या ताफ्यावर गोळीबार; एक नेता ठार

बलुचिस्तानमध्ये नॅशनल पार्टीच्या ताफ्यावर गोळीबार; एक नेता ठार

Next

इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये शनिवारी बलुचिस्तान नॅशनल पार्टीच्या ताफ्यावर केलेल्या अंधाधुंद गोळीबारात पक्षाचा नेता ठार झाला आहे.


 हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी ताफ्यावर जोरदार गोळीबार केला. यामध्ये  अमानुल्लाह ज़ाहरी यांचा मृत्यू झाला. एका वृत्तानुसार त्यांच्यासह चार ते पाच जण ठार झाले आहेत. 


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेता अमानुल्लाह ज़ाहरी यांना लक्ष्य करूनचा हा गोळीबार करण्यात आला. हल्ल्यावेळी जाहरी यांच्या वाहनांचा ताफा खुजदारच्या भागातून जात होता. या हल्ल्यामध्ये जाहरी यांच्या नातवाचाही मृत्यू झाला आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. 


1948 पासून बलुचिस्तान पाकिस्तानच्या ताब्यात आहे. बलुचिस्तानचा दावा आहे की, त्यांनी इंग्रजांनी 11 ऑगस्ट 1947 लाच स्वातंत्र्य दिले होते. मात्र, पाकिस्तान या भागाला त्यांच्या देशाचा हिस्सा मानत आहे. पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानच्या आंदोलनांना निर्दयी पद्धतीने चिरडले आहे. 
भारताने जम्मू काश्मीरचे विभाजन केल्याने बलुचिस्तानमध्येही पाकिस्तानच्या विळख्यातून सोडविण्याची मागणी होत आहे. 

Web Title: firing on Balochistan National Party's convoy; leader killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.