खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये अंदाधुंद गोळीबार, १६ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 09:56 PM2020-04-20T21:56:53+5:302020-04-20T21:59:12+5:30

लॉकडाऊनमध्ये रविवारी कॅनडाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेदनादायक हिंसक घटना घडली आहे.

Firing in canada, 16 people killed pda | खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये अंदाधुंद गोळीबार, १६ जणांचा मृत्यू 

खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये अंदाधुंद गोळीबार, १६ जणांचा मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देया गोळीबारात 16 जण मृत्युमुखी पडले, अशी माहिती वृत्तसंस्था एएफपीने दिली आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना कॅनडाच्या ३० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी खळबळजनक घटना आहे.

कोरोनामुळे जगभरात हाहाकार पाहायला मिळत असून दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे प्रमाण देखील वाढत आहे. अनेक देशात लॉकडाऊन आहे. अशा लॉकडाऊनमध्ये रविवारी कॅनडाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेदनादायक हिंसक घटना घडली आहे. लॉकडाऊन असूनही रविवारी पोलिसांचे कपडे घालून एका बंदूकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 16 जण मृत्युमुखी पडले, अशी माहिती वृत्तसंस्था एएफपीने दिली आहे.


कॅनडामधील नोव्हा स्कॉशिया प्रांतात एका व्यक्तीने गोळीबार करण्याचे हिंसक कृत्य केले आणि रविवारी 16 लोक ठार केले, हा देशाच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक हल्ला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ज्याने गोळीबार केला आहे, त्यांची ओळख पटली असून त्याचे नाव  51 वर्षीय गॅब्रिएल वॉर्टमन असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोरही मरण पावला आहे. सुमारे 12 तास चाललेल्या या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

हैलिफ़ैक्सच्या उत्तरेस ६० मैलांवर (१०० किलोमीटर) ग्रामीण बंदरगाह पोर्टापिकमध्ये घराच्या आत आणि बाहेर अनेक मृतदेह सापडले, पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना कॅनडाच्या ३० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी खळबळजनक घटना आहे.
 

Web Title: Firing in canada, 16 people killed pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.