कुटुंब नियोजन केंद्रावर गोळीबार
By admin | Published: November 29, 2015 02:59 AM2015-11-29T02:59:32+5:302015-11-29T02:59:32+5:30
बंदूकधाऱ्याने कुटुंब नियोजन केंद्रावर केलेल्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यासह तीन जण ठार, तर नऊ जण जखमी झाले. हल्लेखोर नंतर पोलिसांना शरण आला.
वॉशिंग्टन : बंदूकधाऱ्याने कुटुंब नियोजन केंद्रावर केलेल्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यासह तीन जण ठार, तर नऊ जण जखमी झाले. हल्लेखोर नंतर पोलिसांना शरण आला.
कोलोरॅडो शहरातील या केंद्रावर बंदूकधाऱ्याने शुक्रवारी सायंकाळी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना अनेक तास ओलिसही ठेवले होते. जवळपास पाच ते सहा तासांनंतर मारेकरी पोलिसांना शरण आला. केंद्रावरील लोकांना ओलिस ठेवल्यानंतर त्याने गोळीबार केला होता, असे पोलिसांनी सांगितले. जखमींमध्ये पाच पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. लक्षावधी अमेरिकन नागरिकांनी थँक्सगिव्हिंग हॉलिडे साजरा केल्यानंतर ही घटना घडली.
हा गोळीबार करण्याचे कारण समजले नाही, असे कोलोरॅडोचे महापौर जॉन सुथर्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हल्लेखोराकडे आकाराने लांब अशी बंदूक होती. त्याने इमारतीमध्ये स्वत:सोबत अनेक वस्तू आणल्या होत्या. त्यात बहुधा स्फोटके असावेत, असे ते म्हणाले. एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला आहे. (वृत्तसंस्था)