Firing In Bus Video: धावत्या बसमध्ये चालक आणि प्रवाशाचा एकमेकांवर गोळीबार; पाहा धक्कादायक VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 08:57 PM2023-05-29T20:57:17+5:302023-05-29T20:58:36+5:30

Firing In Bus Video: हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Firing In Bus Video: Driver and passenger shoot at each other in running bus; WATCH THE SHOCKING VIDEO... | Firing In Bus Video: धावत्या बसमध्ये चालक आणि प्रवाशाचा एकमेकांवर गोळीबार; पाहा धक्कादायक VIDEO...

Firing In Bus Video: धावत्या बसमध्ये चालक आणि प्रवाशाचा एकमेकांवर गोळीबार; पाहा धक्कादायक VIDEO...

googlenewsNext

Firing In Bus Video: धावत्या बसमध्ये गोळीबाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये बस चालक आणि प्रवासी एकमेकांवर गोळीबार करताना दिसत आहेत. ही घटना बसमध्ये लागलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली. बसच्या आत घडलेली घटना पाहून कोणालाही धक्का बसेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे धक्कादायक प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाचे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात शार्लोट भागात घडली. प्रवाशाने चालकाच्या सीटजवळ येऊन त्याच्याशी हुज्जत घातली, शिवीगाळ केली. बोलतेवेळी त्याने बंदूकही बाहेर काढली. त्याच्या दोन्ही हातात बंदूका होत्या. यादरम्यान चालकाने त्याच्याकडील बंदूकीतून गोळीबार केला.

कशामुळे वाद झाला ?
ओमरी टोबियास (22) असे या प्रवाशाचे नाव आहे, तर डेव्हिड फुलार्ड असे चालकाचे नाव आहे. स्टॉपवर उतरण्यावरून ड्रायव्हर डेव्हिड आणि प्रवासी ओमरी यांच्यात वाद सुरू झाला. ओमरी नियोजित थांब्यापूर्वी बस थांबविण्याचा आग्रह धरत होता. डेव्हिडने पुढच्या स्टॉपवर थांबू, असे सांगताच ओमरीने बंदूक बाहेर काढली. हे पाहून डेव्हिडनेही बंदूक बाहेर काढली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांवर गोळीबार केला.

या गोळीबारात बसच्या आतील काच चक्काचूर झाली. डेव्हिडच्या गोळीबाराने घाबरलेला ओमरी धावून सीटच्या मागे लपला. शेवटी ओमरी बसमधून उतरून पळून गेला. ही संपूर्ण घटना बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत चालकाच्या हाताला आणि प्रवाशाच्या पोटात दुखापत झाली आहे. दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: Firing In Bus Video: Driver and passenger shoot at each other in running bus; WATCH THE SHOCKING VIDEO...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.