पॅरिसमध्ये पुन्हा गोळीबार

By admin | Published: January 9, 2015 02:25 AM2015-01-09T02:25:17+5:302015-01-09T02:26:05+5:30

बुधवारी चार्ली हेब्डो या साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये शोक दिन पाळला जात असतानाच गुरुवारी नव्याने झालेल्या गोळीबाराने पॅरिस शहर पुन्हा हादरले.

Firing in Paris again | पॅरिसमध्ये पुन्हा गोळीबार

पॅरिसमध्ये पुन्हा गोळीबार

Next

पॅरिस : बुधवारी चार्ली हेब्डो या साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये शोक दिन पाळला जात असतानाच गुरुवारी नव्याने झालेल्या गोळीबाराने पॅरिस शहर पुन्हा हादरले. शहराबाहेरच्या परिसरात सशस्त्र हल्लेखोराने स्वयंचलित रायफलीतून केलेल्या गोळीबारात एक महिला पोलीस अधिकारी ठार झाली तर एक नागरिक
गंभीर जखमी झाला. हा हल्लेखोर फरार झाला आहे.
पॅरिस पोलिसांच्या मते बुधवारी व गुरुवारी झालेल्या हल्ल्याचा काहीही परस्पर संबंध नाही. चार्ली हेब्डो साप्ताहिकावर बुधवारी झालेल्या हल्ल्यात १२ जणांचा बळी गेल्यानंतर फ्रान्समध्ये अनेक ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटली. शिवाय पूर्व फ्रान्समधील एका गावात कबाबच्या दुकानात स्फोट झाला; पण त्यात कोणीही जखमी झाले नाही.
बुधवारी साप्ताहिकाच्या कार्यालयात झालेल्या हल्ल्याप्रकरणी सात
संशयितांना अटक करण्यात आली आहे. चार्ली हेब्दो साप्ताहिकाच्या कार्यालयातील हत्याकांडामुळे संपूर्ण

देश स्तब्ध झाला आहे, तसेच जगातील विविध देशातील लोक या हल्ल्याच्या विरोधात मोर्चे काढत आहेत. फ्रान्समधील विविध निषेध मोर्चात १ लाख लोक रस्त्यावर आले. रशियापासून अमेरिकेपर्यंत जगातील अनेक देशात हजारो लोकांनी आय अ‍ॅम चार्ली असे लिहिलेले फलक हातात घेऊन मोर्चे काढले व माध्यम स्वातंत्र्याचा तसेच वादग्रस्त चालीर् हेब्दो साप्ताहिकाला समर्थन दिले. 

राष्ट्रीय शोकदिन 
फ्रान्समधील या हल्ल्यानंतर गुरुवारी राष्ट्रीय शोकदिन जाहीर करण्यात आला. गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात फ्रान्समध्ये राष्ट्रीय शोकदिन पाळण्याची ही पाचवी वेळ आहे.
हल्लेखोर आरोपी 
चेरीफ कौची (३२) व त्याचा भाऊ सईद (३४) हे मुख्य बुधवारच्या हल्ल्यातील मुख्य आरोपी असून, त्यांच्या नावे अटक वॉरंट काढण्यात आली आहेत. या दोघांचाही जन्म फ्रान्समध्ये झाला असून चेरीफवर २००८ साली इराकमध्ये जिहादी पाठविण्यासाठी नेटवर्क उभारल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांचा साथीदार व संशयित आरोपी हमीद मौराद (१८) याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याचे नाव प्रसार माध्यमात आल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला. 
शोकदिन 

 

Web Title: Firing in Paris again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.