गे मॅरेजला पाठिंबा देणारं पहिलं चर्च

By admin | Published: June 9, 2017 08:20 AM2017-06-09T08:20:40+5:302017-06-09T08:20:40+5:30

स्कॉटिश इपिसकपल हे युनायटेड किंडममधील अँग्लिकन चर्च आहे जिथे समलैगिक जोडीला लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे.

The first church to support Gay Marriage | गे मॅरेजला पाठिंबा देणारं पहिलं चर्च

गे मॅरेजला पाठिंबा देणारं पहिलं चर्च

Next

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 9- समलैगिक संबंधांना सगळीकडेच मान्यता मिळते असं नाही पण जगात एक असं चर्च आहे जे गे मॅरेजसाठी परवानगी देतं आहे. स्कॉटिश इपिसकपल हे युनायटेड किंडममधील अँग्लिकन चर्च आहे जिथे समलैगिक जोडीला लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या चर्चमधील सर्वसाधारण सभेमध्ये गे मॅरिजला परवानगी द्यावी की नाही यासाठी मतदान झालं होतं. या प्रस्ताव चर्चच्या सात प्रमुखांकडे चर्चेसाठी पाठवला होता. पण या प्रस्तावावर पुढील वर्षीच्या धर्मसभेत पुन्हा एकदा मतदान केलं जाइल.
 
या प्रस्तावानुसार कुठल्याही अँग्लिकन चर्चच्या गे ख्रिश्चन व्यक्तीला स्कॉटिश इपिसकपल चर्चमध्ये लग्न करण्यासाची परवानगी मिळू शकते. युकेतील या चर्चच्या निर्णयामुळे फक्त पुरूष आणि स्त्री लग्न करू शकतात या सिद्धांताला छेद दिला जातो आहे.
खरंतर स्कॉटलँडमध्ये समलैंगिक संबंधांना परवानगी आहे तसंच समलैंगीक लग्नालासुद्धा 2014 पासून संमती देण्यात आली आहे. पण तेथील अनेक चर्च अशा लग्नाला परवानगी देत नाही. 
 
शुक्रवारी चर्चच्या धर्मसभेत सादर केलेल्या गे मॅरेजच्या प्रस्तावावर सात पैकी पाच पदाधिकाऱ्यांनी आणि 69 टक्के धर्मगुरूंनी त्यांचं समर्थन दाखवलं. यावरून पुढील वर्षी या निर्णयावर सकारात्मक मतदान होइल, असे संकेत मिळत आहेत. जर या प्रस्तावाला संमती मिळाली तर स्कॉटिश इपसिकपल चर्च युकेतील पहिलं मोठं चर्च बनेल जेथे समलैंगिक व्यक्तीला चर्चमध्ये लग्न करायची परवानगी मिळेल. 
 

Web Title: The first church to support Gay Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.