चीनकडून लवकरच मदतीची पहिली खेप अफगाणिस्तानला जाणार, तालिबानने मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:53 AM2021-09-28T11:53:50+5:302021-09-28T11:55:22+5:30
बीजिंग: अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिल्यानंतर चीनने 310 दशलक्ष (31 मिलीयन) अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आता लवकरच ...
बीजिंग:अफगाणिस्तानातीलतालिबान सरकारला मान्यता दिल्यानंतर चीनने 310 दशलक्ष (31 मिलीयन) अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आता लवकरच यातील पहिली खेप तालिबानला पोहोचणार आहे. चीनचे राजदूत वांग यू यांनी ही माहिती दिली आहे. वांग यू यांनी रविवारी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
1 हजार रुपयांपर्यंत लाच घेतली तरी चालेल पण 5-10 हजार रुपये घेऊ नका; आमदाराचं अजब वक्तव्य
चीनचे राजदूत वांग यू म्हणाले की, अफगाणिस्तानला मदत करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. या अनुषंगाने चीन अफगाणिस्तानच्या गरजांकडे पूर्ण लक्ष देत आहे. मदतीची पहिली खेप येत्या काही दिवसांत काबूल विमानतळावर पोहोचेल. पहिल्या खेपेनंतर, इतर आवश्यक सामग्री आणि अन्न पुरवठा करण्यात येईल. हिवाळ्यात अफगाणिस्तानात तीव्र थंडी असते, त्यामुळे यातून वाचण्यासाठीही चीनकडून अफगाणिस्तानला योग्य ती मदत पुरवली जाईल.
हिमाचलच्या लाहौल स्पीतीमध्ये ट्रेकिंगला गेलेले 12 जण अडकले, 2 जणांचा मृत्यू
तालिबानकडून शेजारील देशांना मदतीचे आवाहान
दरम्यान, तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांनी चीनने दिलेल्या मदतीबद्दल आभार मानले. मुत्ताकी म्हणाला की, दोन्ही देशांमध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण वातावरण राहिले आहे. एकमेकांच्या गरजेवेळी दोन्ही देशांनी अनेकदा एकमेकांना मदत केली आहे. चीनकडून मदत मिळाल्यानंतर अफगाणिस्तान सरकार आपल्या नागरिकांपर्यंत ही मदत लवकर पोहचवण्याचा प्रयत्न करेल. यावेळी मुत्ताकीने इतर शेजारील देशांनाही मदतीचे आवाहन केले आहे.