जपानमध्ये पहिला समलैंगिक विवाह

By admin | Published: April 1, 2015 01:23 AM2015-04-01T01:23:52+5:302015-04-01T01:23:52+5:30

जपानची राजधानी टोकिओ शहरातील शिबुया वॉर्डमध्ये समलैंगिक विवाहाला परवानगी देणारा कायदा मंगळवारी मंजूर झाला असून त्यानंतर

The first gay marriage in Japan | जपानमध्ये पहिला समलैंगिक विवाह

जपानमध्ये पहिला समलैंगिक विवाह

Next

टोकिओ : जपानची राजधानी टोकिओ शहरातील शिबुया वॉर्डमध्ये समलैंगिक विवाहाला परवानगी देणारा कायदा मंगळवारी मंजूर झाला असून त्यानंतर लगेचच फुमिनो सुगियामाने आपल्या चार वर्षांपासून मैत्री असणाऱ्या मैत्रिणीशी विवाह केला आहे.
शिबुया वॉर्ड जपानमध्ये समलैंगिक विवाहाला परवानगी देणारा पहिला जिल्हा ठरला आहे. समलैंगिक विवाहाला परवानगी मिळाल्याने असा विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना रुग्णालयात तपासणी व घर भाड्याने मिळणे अशा सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
व्यवहारात स्त्री म्हणून वावरणारा सुगीयामा, मनातून पुरुष आहे. आपले पुरुषत्व त्याला लहानपणापासून जाणवत होते.
त्यामुळे त्याचे प्रेम एका महिलेवर बसले; पण व्यवहारात स्त्री म्हणून वावरत असल्याने त्याला तिच्याशी लग्न करता येईना; पण मंगळवारी झालेल्या कायद्यामुळे ही अडचण दूर झाली आहे.
कोयुकी हिगाशी आणि हिरोको माशुआरा या दोघी महिलांचे एकमेकींवर प्रेम आहे. त्यांनी परस्परांशी विवाह केला आहे. चार महिन्यांपासून या दोघी शिबुया येथे राहत होत्या. मंगळवारी त्यांची इच्छा पूर्ण झाली. (वृत्तसंस्था)

Web Title: The first gay marriage in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.